जागतिक महिला दिन दातेवस्ती येथे उत्साहात साजरा

नवचैतन्य टाईम्स फलटण प्रतिनिधी(दिनेश लोंढे)जागतिक महिला दिनानिमित्त दातेवस्ती सस्तेवाडी येथे दातेवस्ती व महादेव नगर येथील महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम मा श्री सौ ज्ञानेश्वरी कदम (सरपंच) ग्रामपंचायत सदस्य सौ रेवती सपताळे ग्रा,सद्स मा श्री सुनील(आण्णा) वाबळे यांच्या मार्गदर्शनाने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम व उखाणे घेण्याची स्पर्धा घेण्यात आली.तसेच संगीत खुर्ची या स्पर्धा घेऊन प्रत्येक स्पर्धेतून प्रथम तीन क्रमांक काडून बक्षीस वितरण करण्यात आले व या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून फलटण तालुक्यातील गोखळी गावची बालकन्या कु स्वरा योगेश भागवत(कळसुबाई शिखर 1तास 56 मी मद्ये ) सर केल्या बद्दल अयोजकाडून तिचा सत्कार करण्यात आला तसेच गोखळी गावची सुवर्णकण्या कु दीपाली मदने हिने गोवा राज्य इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्या बद्दल तिचा सत्कार घेण्यात आला या महिला दिनाचे अवचित्त साधून वस्तीवरील आशा मॅडम, अंगावाडी शिक्षिका ,प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ,शाळा व्यवस्थापन समिती आद्यक्ष ,उपाध्यक्ष ,यांचाही महिला दिनी सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर गावच्या प्रथम नागरिक सौ ज्ञानेश्वरी राजेंद्र कदम (सरपंच सस्तेवाडी) तसेच ग्रा प सदस्य सौ रेवती गणेश सपताळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा श्री नवनाथ कोलवडकर सर यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आयोजन आदर्श कला व क्रीडा मंडळ यांनी केले या कर्यक्रमाचे नियोजन मा श्री सागर चव्हाण ,श्री अक्षय(मुन्ना) गंगतिरे, ऋषी वाबळे, श्री गणेश मदने ,हर्षद वाबळे श्री गणेश सपताळे विकी वाबळे यांनी केले ,आभार सरपंच ज्ञानेश्वरी कदम यांनी मानले .

error: Content is protected !!