संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

💠 नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🚩 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🚩 *अध्याय ९ वा*
🚩 *¦राजविद्या राजगुह्ययोग¦*
💠 *ओवी ७१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*🌻न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ।भूतभृन्नच भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥५॥*
अर्थ 👉 _कल्पना टाकून पाहू लागलास तर, सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थितही नाहीत असा हा माझा ऐश्वर्ययोग आहे पहा. तसेच भूतांचे धारण करणारा, तथापि अलिप्त असल्याने भूतांचे ठिकाणी स्थित नसलेला आणि ज्याचे ठिकाणी भूतांची कल्पना करता येईल अशा प्रकारचे माझे स्वरूप आहे._
( भगवंताचा ऐश्वर्ययोग म्हणजे सर्वकाही एकरूप, चिद्विलास) 
➖➖➖➖🚩➖➖➖
*💠आमचा प्रकृतीपैलीकडील भावो।जरी कल्पनेवीण लागसी पाहों।तरी मजमाजि भूतें हेंही वावो।जे मी सर्व म्हणऊनि॥७१*
     मायेच्या पलीकडील माझे जे स्वरूप, ते जर कल्पनेशिवाय पाहू लागलास, तर माझे ठिकाणी सर्व भूते आहेत असे जे तुला सांगितले, ते सर्व मिथ्या आहे असे तुला भासेल; कारण सर्व मीच आहे. 
*🌷एऱ्हवीं संकल्पाचिये सांजवेळे।नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे।म्हणोनि अखंडित परि झांवळें।भूतभिन्न ऐसें देखें॥७२॥*
      एर्‍हवी, संकल्परूप संध्याकाळचे वेळेस ज्ञानरूप डोळे अज्ञानरूप अंधकाराने काही वेळ ग्रासले जातात; म्हणून त्या झांजडीत, मी अखंड असता भूते मजहून निराळी दृष्टीस पडतात. 
*🌷तेचि संकल्पाची सांज जैं लोपे ।तैं अखंडितचि आहे स्वरुपें।जैसें शंका जातखेंवो लोपे।सापपण माळेचें॥७३॥*
     त्याच संकल्परूपी संध्याकाळचे वेळेचा लोप झाला म्हणजे, ज्याप्रमाणे नीळमण्याच्या माळेवर कवड्या सापाचा झालेला सर्व भास, शंका दूर होण्याबरोबर नाहीसा होतो, त्याप्रमाणे मी अखंड आहे असा दिसतो.
*🌷एऱ्हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ।काय घडेया गाडगेयांचे निघती कोंभ।परि ते कुलालमतीचे गर्भ।उमटले कीं॥७४॥*
     एर्‍हवी जमिनीतून घागर, मडकी वगैरेचे कोंब स्वतःसिद्ध निघतात काय? परंतु कुंभाराच्या बुद्धीने ते सर्व तयार होतात.
*🌷नातरी सागरींचां पाणीं।काय तंरगाचिया आहाती खाणी।ते अवांतर करणी।वारयाची नव्हे ॥७५॥*
     किंवा समुद्राच्या पाण्यात लाटांच्या खाणी का आहेत? तर ते कृत्य वाऱ्याशिवाय इतराचे नव्हे;
*🌷पाहें पां कापसाचां पोटीं।काय कापडाची होती पेटी।तो वेढितयाचिया दिठी।कापड जाहला॥७६॥*
     हे पहा, कापसाच्या पोटात कापडाचे गठ्ठे असतात का? वापरणाराच्या समजुतीने तो कापड बनला आहे! 
*🌷जरी सोनें लेणें होऊनि घडे।तरी तयाचें सोनेपण न मोडे।येर अळंकार हे वरचिलीकडे।लेतयाचेनि भावें ॥७७॥*
     जर सोन्याचे दागिने बनविले तर सोनेपण नाहीसे होते का? बाकी स्थूल दृष्टीने वापरणार्‍याच्या कल्पनेने ते दागिने दिसतात;
*🌷सांगें पडिसादाची प्रत्युत्तरें ।कां आरिसां जें आविष्करे ।तें आपलें कीं साचोकारें ।तेथेंचि होतें ॥७८॥*
     आपल्या शब्दाचा जो प्रतिध्वनी ऐकू येतो, किंवा आरशात जे आपले स्वरूप आपण पाहतो, तो खरोखर आपल्या बोलण्याचा किंवा पाहण्याचा परिणाम आहे, किंवा आपल्या पूर्वीच ते तेथे होते सांग बरे!
*🌷तैसी इये निर्मळे माझां स्वरुपीं ।जो भूतभावना आरोपी ।तयासी तयाचां संकल्पीं ।भूताभासु असे ॥७९॥*
     त्याचप्रमाणे ह्या माझ्या निरुपाधिक स्वरूपावर जो भूतांच्या कल्पनेचा आरोप घेतो, त्याला त्याच्या कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी भूतांचा भास होतो.
*🌷तेचि कल्पिती प्रकृती पुरे ।आणि भूताभासु आधींच सरे ।मग स्वरुप उरे एकसरें ।निखळ माझें ॥८०॥*
     तीच कल्पना करणारी माया संपली, म्हणजे माझ्या ठिकाणचा भूतांचा भास नाहीसा होतो. मग, माझे निरुपाधिक असे जे शुद्ध स्वरूप, तेच निखालस उरते. 
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*🌸ओवी ८१ पासूनउद्या*
  *🌸¦जयजय रामकृष्ण हरि¦*

error: Content is protected !!