शिरढोण येथील डॉ सरोजा पाटील यांची एमपीएससीच्या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक तर त्यांची पशुधन विकास अधिकारी पदावर नियुक्ती
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर (जालिंदर शिंदे)-शिरढोण(ता कवठेमहांकाळ) येथील डॉ सरोजा पोपट पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत मुलीमधे राज्यात तिसरा क्रमांक पटकावला असुन,त्यांची पशुधन विकास अधिकारी वर्ग -१ (राजपत्रित अधिकारी) या पदावरही नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या या यशाचे परिसरातून अभिनंदन होत आहे.डॉ सरोजा पाटील या अगदी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून,त्यांनी शालेय शिक्षण हे मराठी माध्यमातून घेतले आहे.त्यांचे शालेय शिक्षण हे शिरढोण (ता कवठेमहांकाळ) येथे झाले आहे.तर पदवीचे शिक्षण त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ (जि सातारा) येथे घेतले.तर पदवीत्तरचे शिक्षण भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या शिष्यवृत्तीच्या जोरावर मद्रास व्हेटेरनरी काॅलेज चेन्नई (तामिळनाडू) येथे पुर्ण केले.शिक्षण घेत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षेचाही आभ्यास चालू ठेवला व पुढे जाऊन त्यांनी हे यश संपादन केले.हे यश मिळवताना त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही हे विशेष.अगदी लहानपणापासूनच शिक्षणांची आवड असल्याने जिद्द,चिकाटी व पालकांच्या मोठ्या सहकार्याच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.त्यांना याकामी शाळेचे प्राचार्य,शिक्षक,चुलते नारायण पाटील व पालकांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.