बाज ता.जत येथील डॉक्टरानी बिल मागितले म्हणून खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण निमा असोसिएशन कडून सक्त कारवाईची मागणी
नवचैतन्य टाईम्स प्रतिनिधी(नजिरभाई चट्टरकी) सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील मौजे बाज येथे स्वतःचा खाजगी दवाखाना चालवणारे डॉक्टर जयवंत अण्णाप्पा मासाळ यांना गावातीलच एका व्यक्ती कडून मारहाण करण्यात आली आहे.केवळ औषधोपचारकेलेल्या उधारीचे पैसे मागितल्याने खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आलेल्या या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत याप्रकरणी बीएएमएस डॉक्टरांच्या हितसंरक्षणासाठी काम करणाऱ्या देश पातळीवरील निमा म्हणजेच नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन इंडिया या संघटनेकडून सदर अमानुष भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. असोशियनचे जत शाखेचे अध्यक्ष डॉक्टर महेश पट्टणशेट्टी व सचिव डॉक्टर राजेश जिवाण्णावर यांच्या कडून जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक मा. राजेश रामाघरे यांची भेट घेऊन संबंधित हल्लेखोर आप्पासाहेब गंगाराम गडदे (घोदे) याच्यावर रीतसर गुन्हा नोंद करून तात्काळ अटकेची कारवाई करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.डॉक्टर जयवंत आण्णाप्पा मासाळ हे स्वतः बीएमएस असून गेली 20 वर्षांपेक्षाही जास्त काळ बाज या गावी रुग्णसेवा देत आहेत.करोना काळात कोरोनाचा महा भयंकर कहर पाहून,भीतीपोटी अनेक मोठमोठे नामवंत डॉक्टरांचे दवाखाने बंद असताना,डॉक्टर मासाळ यांनी अहोरात्र झटून अनेकांचे प्राण वाचवले केवळ औषधोपचार केलेल्या उधारी तील पैसे मागितल्याने आप्पासाहेब गडदे (भोदे) याने डॉक्टर मासाळ यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे व जीवे मारण्याची धमकीही दिली.निमा संघटने कडून या भ्याड हल्ल्याचा निषेध करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.योग्य ती कारवाई न केल्यास डॉक्टरांच्या निमा संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.