कुची येथे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंवरावजी पाटील यांची सदिच्छा भेट पालकमंत्री यांच्या शुभहस्ते श्री हनुमान विकास सोसायटीच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार सोहळा संपन्न
नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(जगन्नाथ सकट)कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंवरावजी पाटील सदिच्छा भेट दिली.त्यावेळी त्याचे शुभहस्ते श्री हनुमान विकास सोसायटीच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी युवा उद्योजक भारत पाटील व माजी बांधकाम सभापती भाऊसाहेब पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंतरावजी पाटील यांच्या हस्ते श्री हनुमान विविध कार्यकारी सोसायटी कुचीच्या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला .यावेळी जयंतरावजी पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी विजय पाटील किसन फाकडे,सचिन पाटील कपिल पाटील सुरेश फाकडे विठ्ठल भोसले युवराज पाटील दिलीप पाटील मोहन पाटील,इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.शेवटी माजी बांधकाम सभापती प्राध्यापक भाऊसाहेब पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले