मुचंडी दरेप्पा देवाची यात्रा उत्साहात पार पडली लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावली

नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी (नजीरभाई चट्टरकी)दरिदेवाच्या नावान चांगभल, आई जक्कमादेवीच्या नावान चांगभल च्या गजरात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. द-याप्पा देवाच्या यात्रेची सांगता.सांगली जिल्ह्या च्या जत तालुक्यातील मुचंडी येथिल श्री. दरिदेवाची यात्रा ही एक आगळी वेगळी यात्रा म्हणून महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, केरळ व गोवा या राज्यात ओळखली जाते.या यात्रेसाठी वरिल राज्यातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. ही यात्रा महाराष्ट्र आणी कर्नाटक या दोन राज्याच्या सीमेवरील मोठ्या ओढापात्रात भरते.गत दोनवर्षे कोरोनामुळे ही यात्रा मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत भरविण्यात येत होते. परंतु यावेळी कोरोणाचे निर्बंध उठल्याने ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरली होती. यात्रेकरिता महाराष्ट्र व कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रेकरिता जादा बसची व्यवस्था केली होती.कनमडी ग्रामपंचायत व दरेश्रवर देवस्थान ट्रष्ट च्या माध्यमातून यात्रेकरिता आलेल्या यात्रेकरूंची पाण्याची व सर्व ती सुविधा पुरवण्यात आली होती.यात्रेत विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात व्यापारी आले होते. या यात्रेत मोठ्या प्रमाणात नारळ विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. मेवामिठाईसह, सौंदर्य प्रसाधने, खेळणी, शोभेच्या वस्तू, कृषी ची साधने, कोल्ड्रींक्स,हाॅटेल, हळदी कुंकू अशी विविध प्रकारचे स्टाॅल्स यात्रेत आले होते.ही यात्रा कर्नाटक राज्यातील कनमडी ग्रामपंचायत यांच्या मार्फत भरविण्यात आली होती.यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटक राज्यातील तिकोटा पोलीस ठाण्याचे पोलीस यात्रेत बंदोबस्तासाठी होते. यात्रेकरिता भाविक भक्त दुचाकी, चारचाकी व बैलगाड्यामधून आले होते.या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेत ज्यानी ज्यानी दरिदेवाला नवस केला होता व त्यांचा नवस पूर्ण झाला होता. अशा भाविक भक्तांनी श्री. दरिदेवाच्या प्रत्येक पायरीला नारळ फोडून आपला नवस फेडला यामुळे या यात्रेत मोठ्या प्रमाणात नारळाची उलाढाल झाली आहे.या यात्रेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेत घुळी सोडण्याची प्रथा पुर्वांपार चालत आली आहे. ज्यांच्या घरात श्री. दरिदेव कुळस्वामी आहेत त्या घरातील एक व्यक्ती घुळी म्हणून या यात्रेत अर्धनग्न अवस्थेत हातात अंबाड्याच्या वाकापासून बनविलेला चाबूक घेऊन तो आपल्या अंगावर मारून घेत दरिदेवाच्या नावान चांगभल,आई जक्कमादेवीच्या नावान चांगभल चा गजर करत होता.बुधवारी श्री. दरिदेवाच्या नैवेद्य अर्पण करण्याचा दिवस असल्याने तासगाव तालुक्यातील विसापूर येथिल माने घराण्याकडे श्री दरिदेवाच्या नैवेद्याचा मान असल्याने त्यानी पुरण पोळीचा नैवेद्य देवाला दाखविला त्यानंतर हजारो भक्तानी श्री. दरिदेवाला व आई श्री. जक्कमादेविला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. गुरुवारी पहाटे श्री. दरिदेवाची पालखी व सबिना फिरवण्यात आला. श्री. दरिदेवाच्या पालखीवर हजारो भाविक भक्तांनी खारीक खोबरे व भंडारेची उधळण केल्यानंतर यात्रेची सांगता झाली.ही यात्रा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी देवस्थान व्यवस्थापक कमिटी अध्यक्ष श्री. अलगोंडा बिरादार, उपाध्यक्ष श्री.बसगोंडा पाटील,कार्याध्यक्ष श्री. मल्लापा तुंगळ, शिवानंद मुन्नोळी, भिमराय कोंडी, महांतेश कोरे, हणमंत पुजारी, बाबूगौडा बिरादार, विठ्ठल करवडे,आण्णाप्पा पुजारी, सदाशिव कोळी, पिरणगौडा बिरादार, शिवानंद बिरादार, बसवराज पुजारी, गुरू पुजारी, शिवानंद पुजारी यानी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!