काक्रंबावाडी येथे कोविड-19 व लहान बालकांचे लसीकरण संपन्न

नवचैतन्य टाईम्स उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी(आशा वाघ)तुळजापूर- आज दिनांक २७ मे २०२२ रोजी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी येथे कोविड-19 व लहान बालकांचे लसीकरण पार पडले. सध्या ग्रामीण भागात शेतकरी मोठया प्रमाणात शेतीची मशागत करताना दिसून येत आहे. काक्रंबावाडी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते महेश बजरंग कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हे लसीकरण मोठ्या प्रमाणात पार पडले.
लहान बालके यांना विविध आजारावरील लसीकरण करण्यात आले. मातांचे प्रश्न विचारात घेण्यात आले. कोविड-19 चे दुसरा व बूस्टर डोस घेण्याचे राहिलेले नागरिक यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात आले.हे लसीकरण योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी युवा समाजसेवक महेश बजरंग कोळेकर तसेच आशा मीनाक्षी हांडे, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच श्री. कुलकर्णी सर, आरोग्य परिचारिका बाई भोसले मॅम यांचे योगदान लाभले.

error: Content is protected !!