स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे उस्मानाबाद उपजिल्हाधिकाऱ्याना निवेदन सादर
नवचैतन्य टाईम्स उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी(आशा वाघ)धाराशिव :हा देशातील मागास जिल्हयांच्या यादीतील सर्व क्षेत्रात पिछाडीवर असलेला जिल्हा,शिक्षण ,उद्योग,व्यवसाय,नोकरी,शेती या सर्वच क्षेत्रात सुधारणा होणे गरजेचे आहे,येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून २००४ पासून स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करण्यात येत आहे.यासाठी जिल्ह्याला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे उपकेंद्रा ऐवजी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले जावे,व विद्यार्थी आणि पालक यांची ३००किलोमीटरची धावपळ,फरफट कमी होऊन गैरसोय थांबावी,ही धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते,पक्ष कार्यक्रर्ते ,विद्यार्थी,शिक्षक, शिक्षणक्षेत्रातील मंडळी यांची मागणी आहे,त्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असताना,परवा विद्यापीठ अधिसभा सदस्य श्री. संजय मामा निंबाळकर यांचेवर केलेल्या शाईफेकीच्या घटनेचा निषेध करून कारवाई करावी व विद्यापीठ स्थापन करण्यात यावे.या मागणीचे निवेदन,आज महाराष्ट्र राज्य शिक्षकसेनेच्या वतीने शिक्षकसेनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. गोविंद काळे सर,शिक्षकसेना जिल्हाध्यक्ष श्री सतीश खोपडे सर,नगरसेवक श्रीसिद्धेश्वर कोळी सर,प्रा. चिंचडवाड सर,व पदाधिकारी यांचे उपस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी श्री शिवकुमार स्वामी यांना देण्यात आले.