पंढरीची वारी

नवचैतन्य टाईम्स वाई(सौ.सरस्वती वाशिवले) !!राम कृष्ण हरी!!
//मागणी//
हेचि दान देगा देवा,
तुझा विसर न व्हावा!!१!!
गुण गाईन आवडी,
हेचि माझी सर्व जोडी!!२!!
न लगे मुक्ति धन संपदा,
संत संग देई सदा !!३!!
तुका म्हणे गर्भवासी,
सुखे घालावे आम्हांसी!!४!!
———————————————-
वारी सुरु झाली आणि अंतर्मनात पांडुरंगाला वरदान मागण्याची इच्छा शक्ती निर्माण झाली.अनेक संतानी विनंती करुन आशीर्वाद पर विपुल अभंग लिहिले आहेत.परंतु संत तुकाराम महाराज यांचा वरील अभंग अभ्यासु वृत्तीच्या अनेक साधकांनी अंतर्मुख होऊन वर्णन केलेले आहे.सर्व सामान्य पणे जीवन जगणाऱ्या भक्तीला ईश्वराच्या करुणेचा स्पर्श होऊन मुक्ती हेच दान सर्वश्रेष्ठ वाटते आहे.परमेश्वरी प्रेमाचा,नामाचा भक्ताला विसर पडता कामा नये.नामाच्या स्मरणात मुक्तीचीद्वारे सर्वांच्या साठी खुली असावीत.ते दान चिरंतन कायम स्वरुपाचे मुक्तीचे धन वाढतच राहणार आहे.मात्र अन्नदान- क्षणिक तृप्ती,रक्तदान,अवयव दान.. पण तेही नाशवंत आहे.मग श्रेष्ठ असे नामदान ‘ हे मो क्षप्राप्तीचे सुलभ साधन आहे म्हणून तुझे स्मरण व चिंतन घडो दे! त्यासाठी देवाआम्हाला पुन्हा पुन्हा गर्भवास मिळाला तरी चा लेल पण संतांच्या सहवासात ठेवावे असे आर्तविचारांचा गंध या अभंगातुन दरवळतो आहे. गर्भ वासाच्या यातना ही सु खाने भोग ण्याचे सामर्थ्य आमच्यात येईल कारण तो केशव आपल्या निश्चित मागे पुढे होऊन जीवन रक्षण व घडवणारा आहे. अशा विचारांचे मागणे वारी निमित्त पांडुरंगाला मागत आहे.
सौ.सरस्वती वाशिवले रा.वाई

error: Content is protected !!