यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
नवचैतन्य टाईम्स उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी(आशा वाघ)तुळजापूर :- येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी महाविद्यालयाचे प्.प्राचार्य डॉ अनिल शित्रे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिवाजी जेटीथोर,जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विलास राठोड, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. एन. एस. कदम यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमांस संतोष वाळके, सुनील हत्तीकर यांची उपस्थिती हॊती.