संखमध्ये तुकाराम बाबा यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठकीचे आयोजन म्हैसाळ योजना,पायी दिंडी व बळीराजा साहित्य सम्मेलनावर होणार चर्चा

नवचैतन्य टाईम्स जत(प्रतिनिधी)-जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, म्हैसाळ योजना, पायी दिंडी व पुढील वर्षी संख येथे होणाऱ्या राष्ट्रीय बळीराजा साहित्य संमेलना संदर्भात चर्चा, नियोजन व म्हैसाळ लढयाची दिशा ठरविण्यासाठी सोमवारी दुपारी एक वाजता संख येथील बाबा आश्रमात शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.चिकलगी
भुयार मठाचे मठाधिपती,श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडणार आहे .या बैठकीविषयी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की, दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. आजही जत तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्याच्या, शेतीच्या पाण्यासाठी लढा उभारावा लागतो,शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळतहे दुर्देव आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही ही बाब दुर्देवी आहे. जत पूर्व भागात म्हैसाळ सहावा टप्पा पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले पण अद्याप पाणी मिळण्याचा थांगपत्ता नाही.जत पूर्व भागाला म्हैसाळचे पाणी मिळावे यासाठी पुन्हा लढा उभारण्यात येणार आहे. महापूर, कोरोना यामुळे म्हैसाळच्या पाण्यासाठी संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी निघू शकली नाही. शासनाचे याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी पुन्हा पाण्यासाठी पायी दिंडी काढण्याचे नियोजन आहे त्यावर या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.तासगाव येथे पहिले राष्ट्रीय बळीराजा साहित्य संमेलन पार पडले. दुसरे साहित्य संमेलन संख येथे पार पडणार आहे. या संमेलनाच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. बळीराजा साहित्य संमेलनाचे नियंत्रक बाळासाहेब रास्ते हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या सदस्यांनी, साहित्य प्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

error: Content is protected !!