अर्जुन गेंड यांच्या कडून विठुरायाचीवाडी येथील मंगोबा मंदिरास एक लाखाचा निधी

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-विठुरायाचीवाडी (ता कवठेमहांकाळ) येथील मंगोबा मंदिराच्या बांधकाम व सुशोभिकरणासाठी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन गेंड(सर)यांनी व्यक्ती करीत्या रोख एक लाखाचा निधी मंगोबा देवस्थान ट्रस्टकडे सुपुर्द केला .यावेळी ग्रामस्थ व भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर निधी ट्रस्टच्या वतीने धनगर समाजाचे जेष्ठ नेते राम म्हानूर यांनी स्विकारला.
यावेळी बोलताना अर्जुन गेंड (सर) म्हणाले की गावात मंगोबा मंदिराचे बांधकामासह सुशोभीकरणचे काम अगदी झपाट्याने सुरू असुन ते गावात वैभवात नक्कीच भर घालणार आहे.त्यामुळे या करीता समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येणे गरजेचे असल्याचे सांगितले.यावेळी मेजर राम म्हानूर,उपाध्यक्ष सदाशिव घुणके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी राम म्हानूर,सदाशिव घुणके,अविनाश घुणके,अरुण वावरे,राम वावरे,खंडू वावरे,बाबासाहेब खोत,शहाजी दोडमिसे,तानाजी आवळेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!