शाहिर सचिन धुमक यांना “विशेष गौरव पुरस्कार जाहीर

नवचैतन्य टाईम्स मुंबई : ( कु.दिपक कारकर )

सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय व आर्थिक कार्यावर भर देण्यासाठी समाज कार्याची आवड असणाऱ्यांनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अन्यायाविरुद्ध लढा देऊन स्त्रीयांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे.अशा विचारधारेने चालणारी पुण्यातील समता गौरव पुरस्कार – २०१६,छत्रपती संभाजी राजे गौरव पुरस्कार-२०१८,पोलिस मित्र संघ,महाराष्ट्र पुरस्कार – २०१९ सन्मानित अग्रगण्य असणारी संस्था “सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर” (रजि.) महा.प्रांत,ग्रामीण शाखा,मुंबई शाखा यांच्या सयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी कोकण,मुंबई सह महाराष्ट्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणारा ११ वा वर्धापनदिन बुधवार दि.३० जानेवारी २०१९ यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड पुणे येथे रात्रौ ०८:०० वा.संपन्न होणार आहे.

सह्याद्री कुणबी संघाच्या ११व्या वर्धापनदिनाच्या निमित्त या भव्य-दिव्य दैदिप्यमान सोहळ्यात प्रतिवर्षी कोकण सह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो.यंदाच्या ११ व्या वर्धापनदिनी कोकणातील चिपळूण तालुक्यातील ढाकमोली गावचे कुणबी सुपुत्र कोकणातील नमन,शक्ती-तुरा,भारूड,भजन कलेत आपला वेगळाच ठसा निर्माण करून कलाप्रेमी कवी/गायक/तुरेवाले शाहिर सचिन धुमक यांची “शक्ती-तुरा” कलेतील उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सांस्कृतिक विभागातील “विशेष गौरव पुरस्कार -२०१८-१९” साठी निवड करण्यात आली आहे.प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.कवी/गायक शाहिर सचिन धुमक यांना प्राप्त झालेल्या या पुरस्कार बद्दल सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर मुंबई विभाग अध्यक्ष कु.दिपक कारकर,सह्याद्री कुणबी संघ रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख श्री.राजेंद्र भुवड, सह्याद्री कुणबी संघ महाराष्ट्र प्रांत प्रसिध्दी प्रमुख पत्रकार श्री.शांताराम गुडेकर,सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर मुंबई विभाग प्रसिद्धी प्रमुख पत्रकार कु.केतन भोज यांच्यासह शाहिर सचिन धुमक यांचा चाहते ग्रूप व श्री.समर्थ बाजी नाच मंडळ ढाकमोली,पाष्टेवाडीच्या वतीने अभिनंदनासह कौतुक होत आहे.

जत नवचैतन्य टाईम्स चे नवनवीन अपडेट्स, लेख जाहिराती साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या अथवा वाटशॉप नंबर ला संपर्क करा 9405555811 /9823814533

error: Content is protected !!