पाचगणी आरोग्य केंद्रास उत्तम सेवा उपलब्ध करुन देणार — सार्वजनिक बांधकाम मंत्री(उपक्रम )आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे

नवचैतन्य टाईम्स पाचगणी (दिपराज गायकवाड)मा सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम)आरोग्य मंत्री एकनाथ शिंदें यांनी पाचगणी आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी आरोग्य सेवा संबधी तात्काळ व उत्तम दर्जाची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले. रूग्ण वाहिकांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले व उत्तम दर्जाची सेवा तसेच मुबलक औषधे व लसीकरण उपलब्ध केली जाईल.तसेच अद्यावत रुग्णालय बनवुन उत्तम प्रकारे रूग्ण सेवा सुरू करून नागरिकांची होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर करण्यात येईल असे ग्वाही शिंदे यांनी दिली. यावेळी क्रांती मजदुर सेना जिल्हा अध्यक्ष नौशाद(भाई)सय्यद व इतर सहकारी कर्मचारी अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . जत नवचैतन्य टाईम्स चे नवनवीन अपडेट्स, लेख जाहिराती साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या अथवा वाटशॉप नंबर ला संपर्क करा 9405555811 /9823814533/ दिपराज गायकवाड (पाचगणी) 9168572718

error: Content is protected !!