कवठेमहांकाळ येथील राजर्षी शाहू विचारमंच यांच्या वतीने विर सिंदूर लक्ष्मणाच्या पुतळ्यास ५१ हजारचा निधी सुपुर्द

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-कवठेमहांकाळ येथील राजर्षी शाहू कला क्रीडा व संस्कृतीक विचारमंंचाच्या वतीने सिंदूर (ता जत)येथे शहीद वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उभारल्या जात असलेल्या शहीद वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ५१ हजाराचा रोख निधी देण्यात आला.सिंदूर (ता जत) येथे घेण्यात आलेल्या वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारंभात कवठेमहांकाळ येथील राजर्षी शाहू विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रा दादासाहेब ढेरे यांनी हा रोख निधी प्रसिद्ध कन्नड अभिनेते व सदर समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ आर के पल्लकी यांच्याकडे सुपुर्द केला.यावेळी जेष्ठ विचारवंत प्रा डॉ राजेंद्र कुंभार,उमराणीचे नेते आप्पासाहेब नामद, वीर सिंदूर लक्ष्मणाचे पणतू राम व लक्ष्मण नाईक,डॉ धनाजी गुरव,भिमगोंडा पाटील,ॲड के डी शिंदे,सरपंच गंगाप्पा हारुगेरी ,सोसायटीचे चेअरमन आण्णासाहेब जनगोंड,संजय तळवलकर,काॅ मारुती शिरतोडे,प्रा गौतम काटकर,ज्योती आदाटे,सदाशिव मगदूम,लक्ष्मण चव्हाण सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!