शेतकऱ्यांच्या सुख सन्मानासाठी विधानमंडळात सजग लोकप्रतिनिधींची गरज– गुणवंत हंगरगेकर

नवचैतन्य टाईम्स — राजुरा (शब्बीर जागीरदार)
शेतकरी, शेतमजूर यासह सर्व श्रम करणा-यांना सुखी व समाधानाने जगण्याचा हक्क असुन यासाठी केंद्र व राज्यात जनतेने ख-या अर्थाने प्रामाणिकपणे काम करणा-या व लोकोपयोगी कायदे करण्यासाठी प्रामाणिक,अभ्यासु व सजग उमेदवारांना निवडून पाठविले पाहिजे,असे मत शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष व शेतीतज्ञ गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी केले.
राजुरा येथे शेतकरी संघटनेने आयोजीत केलेल्या कृषि महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात इंजिनीअर गुणवंत पाटील बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अँड.वामनराव चटप यांनी भूषविले. प्रमुख अतिथी माजी राज्यमंत्री डाँ.रमेश गजबे,माजी आमदार सौ. सरोजताई काशीकर, पुरातत्व विभागाचे माजी संचालक डाँ.जी.एस खाजा, चंद्रपूरचे उद्योजक रतिलालभाई चव्हाण, डाँ. दाभेरे, पत्रकार बी.के.खाजा, बाजार समिती सभापती कवडू पोटे, उपसभापती नारायण गड्डमवार,रंभाताई गोठी,सतिश दाणी, उल्हास कोटमकर,तेजस्विनी कावळे, अरुण नवले,अँड.मुर्लीधर देवाळकर, निळकंठ कोरांगे,रमेश नळे, सिंधु बारसिंगे,रविद्र गोखरे,प्रभाकर ढवस, भाऊजी किन्नाके, अँड.श्रिनिवास मुसळे,ज्योती तोटेवार, कमल वडस्कर, हरीदास बोरकुटे,नानाजी पोटे, ,संजय करमनकर,रवि गोखरे, आबाजी ढवस, अँड. राजेंद्र जेनेकर,सुभाष रामगिरवार,रमाकांत मालेकर, इ. मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानाहून बोलतांना अँड. वामनराव चटप म्हणाले की,शेतक-यांचे आत्मभान जागृत करण्यात हा महोत्सव यशस्वी झाला अाहे. एका बाजुला नविन तंत्रज्ञानाची माहिती तर दुस-या बाजुला शेतीसंबंधी विविध विषयांचे विचारमंथन व तज्ञांचे मार्गदर्शन यामुळे शेतकरी अधिक प्रगल्भ होवून आपल्या व्यवसायाकडे नव्या दृष्टीकोनाने बघेल. या महोत्सवात शेतकरी, कामगार, महिला, युवक, विद्यार्थी या सर्वांनाच काही नाविन्यपुर्ण बघायला अथवा शिकायला मिळाले आहे. यानिमीत्ताने सर्व शेतकरी एकत्र येऊन आपल्या लुटीचा, सरकारी अन्याय व शोषणाचा, शेतमालाच्या किंमतीचा, देशावरील कर्ज व अर्थशात्राचा विषय समजून घेऊ शकले, ही आनंदाची बाब आहे. परंतू आपल्या सन्मानासाठी आता लढाईला सिध्द होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आपल्या प्रभावी भाषणात अँड.चटप यांनी केले. डाँ. रमेश गजबे यांनी देशातील श्रीमंत व गरीब यांची दरी रुंदावत असुन हे दुर्दैवी असल्याचे मत मांडले.माजी आमदार सरोज काशीकर म्हणाल्या की, विधानसभेत शेतक-यांचे प्रश्न मांडतांना कुणी दिसत नाही, ही उणिव भरुन काढण्याची जबाबदारी राजुरा भागातील लोकांवर आहे. शेतक-यांची वकीली करणारा माणूस कायदेमंडळात असणे गरजेचे असल्याचे सौ.काशीकर यांनी सांगितले. डाँ.खाजा यांनी वेगळा विदर्भ मिळाल्याशिवाय शेतक-यांना न्याय मिळणे दुरापास्तअसल्याचेसांगीतले.याकार्यक्रमातशेती,उद्योग समाजसेवा आणि तीस वर्षापासुन चळवळीला साथदेणा-या किसन अवताडे,गोसाई देरकर, रंभाताई नवरतन गोठी, रुखमा राठोड, संतोष आस्वले, किसन महात्मे, श्यामराव ठाणेकर, शेख खाजा,देवाजी हुलके,खुशाल सोयाम, मारोती लोहे,आबाजी धानोरकर,बाबुराव चिकटे,देविदास वारे, डाँ.भास्कर मुसळे, विठ्ठल दोरखंडे,डाँ. आनंद निरंजने, भिवसन गायकवाड,मारोतराव येरणे,फकरु मडावी,अनिल वलादे, सायसराव कुंडगिर, बाबुराव चिकटे,अंजना पेंदोर, विमल वाघुजी गेडाम, मुकुंद चन्ने यांचेसह अनेक मान्यवरांचा शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर दिवे , संचालन प्राचार्य अनिल ठाकुरवार व आभारप्रदर्शन कपिल इद्दे यांनी केले.या कार्यक्रमाला बंडू राजुरकर,अभिजीतसावंत,अनंतायेरणे,पी.यु.बोंडे,आबाजी धानोरकर, नरेंद्र काकडे,बंडू माणूसमारे, हसनभाई रिझवी, दिनकर डोहे सोशल मिडिया विधानसभा सयोजक सूरज जिवतोडे, तालुका अध्यक्ष देव पडोळे, शहर अध्यक्ष सुरज बोरकुटे इ.सह मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या

नवचैतन्य टाईम्स चे नवनवीन अपडेट्स, लेख जाहिराती साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या अथवा वाटशॉप नंबर ला संपर्क करा 9405555811 /9823814533

error: Content is protected !!