लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ५३ व्या स्मृतींदिनानिमित्त मरोळ पाईपलाईन मध्ये विनम्र अभिवादन
नवचैतन्य टाईम्स मुंबई(दिनेश लोंढे)-तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णा भाऊ साठे यांची ५३ व्या स्मृतींदिना निमित्त मातंग बंधू भगिनींनी रिपाइं कार्यालय,वॉर्ड क्र.८२(84) द.ग्रेट इंदिरा नगर,मरोळ पाईपलाईन, अंधेरी कुर्ला रोड, मुंबई या ठिकाणी अर्जुनराव गायकवाड यांच्या अध्यक्ष तेखाली छोटखानी सभा आयोजित करण्यात आली होती. अण्णा भाऊ साठे यांचा १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव येथे जन्म झाला होता. अण्णा भाऊ साठे यांचे फार शिक्षण झाले नव्हते. तरी त्यांनी ३५ कादंबर्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य आणि १९ पोवाडे रचले आहेत. अण्णा भाऊ हे कम्युनिस्ट विचारसरणीचे होते तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते.वारणेचा वाघ, विजयंता, फकीरा, इभ्रत या कादंबरीवर चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. १८ जुलै १९६९ रोजी त्यांचे निधन झाले. या वेळी रिपाइं मुंबई प्रदेश चिटणीस रतन अस्वारे, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचें भीमराव गमरे, भाजपा वॉर्ड अध्यक्ष परमात्मा गुप्ता,रिपाइं वॉर्ड उपाध्यक्ष सुदेश कडवे ,सरचिटणीस दिलीप कांबळे, वॉर्ड अध्यक्ष राजेंद्र आंबावडे, महिला वॉर्ड अध्यक्षा शकुंतला कांबळे,हाय फाय इंग्लिश कोचिंग क्लासेसचे आविनाश पालंडे सर,प्रमोद गोतपागर आदी मान्यवरांनी भाषणे केली,सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले.अण्णा भाऊ यांची ५३ व्या स्मृतींदिना निमित्ताने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मातंग बंधू भगिनींच्या वतीने मरोळ पाईपलाईन विभागात विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी गणेश ठोकळे, किशोर रनशूर, शरद गायकवाड, नागेश भिसे, शिवाजी कुचेकर, शेषराव घाटूळ , दशरथ गायकवाड, सविता भल्लाल, सुमन गायकवाड, कांता गायकवाड, मायावती तांबे, काशीबाई सूर्यवंशी,आंबवडे आजी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.