मनसेला घवघवीत यश मिळू दे यासाठी मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांचे तुळजाभवानी चरणी साकडे
नवचैतन्य टाईम्स उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी(आशा वाघ)तुळजापूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आदरणीय अविनाशजी अभ्यंकरसाहेब यांनी आज दि.२२ जुलै २०२२ रोजी सकाळी १० वाजता श्री तुळजाभवानी मातेची यथासांग पुजा अर्चा करून देविस आगामी होवू घातलेल्या राज्या तील नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत मनसेला घवघवीत यश मिळू दे यासाठी देविस साकडे घातले.पौरोहित्य भोपे पुजारी सुहास भैय्ये कदम यांनी केले.यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे धाराशिव जिल्हा संघटक अमरराजे कदम,शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष राहूल बचाटे सर,जिल्हा सचिव दादा कांबळे,उमरगा लोहारा विधानसभा शाहुराज माने,लोहारा वि.से.तालुकाध्यक्ष विवेक बनसोडे,धाराशिव उप तालुकाध्यक्ष सलीम औटी तुळजापूर मनसेचे माजी तालुकाध्यक्ष राजकुमार कोरेकर,खंडू कुंभार,उमेश कांबळे,अक्षय साळवे,झुंबर काळदाते,सौरभ देशमुख,आदी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.