दामोदर नाट्यगृहात कडवई ओकटेवाडी(पाचभावकी)यांचे लोकप्रिय बहुरंगी लोकनाट्य तमाशाचे आयोजन

नवचैतन्य टाईम्स मुंबई :(दिपक कारकर) कोकणातील नमन(खेळे)शक्ती-तुरा(जाखडी नृत्य)या लोककला सर्वश्रुत आहेत.मात्र गेली अनेक वर्षे कालपरत्वे या कलेत बदल करून अजूनही महाराष्ट्राची लोकप्रिय लोककला लोकनाट्य तमाशा आजही रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील माता वरदान देवी बहुरंगी लोकनाट्य तमाशा स्त्री विरहीत सादरकर्ते- माता सालबाई देवी सेवा मंडळ कडवई ओकटेवाडी(पाचभावकी)हे मंडळ या लोककलेचं जतन संवर्धन करून ग्रामीण-पुणे-मुंबई रंगमंचावर उत्तमरीत्या सादरीकरण करत आहे.मुंबई रंगमंचावर शुभारंभाचा प्रयोग कोकणातील तमाम रसिक प्रेक्षकांनी गौरविलेला कार्यक्रम लवकरच मुंबई परळ रंगमंचावर रसिकांना याचा आश्वाद घेता येणार आहे श्री.पाणबुडी देवी कलामंच(पाचेरी सडा) ता.गुहागर, जि.रत्नागिरी प्रस्तुतश्री.बापू ओकटे,श्री.रमेश कोकमकर,कु.संतोष घाणेकर.दिपक कारकर,श्री.रमेश भेकड आयोजित उपरोक्त मंडळाचा बहुरंगी लोकनाट्य तमाशा ( स्त्री विरहीत ) शुक्रवार दि.१५ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री ०८:३० वा.दामोदर नाट्यगृह.परळ येथे आयोजित करण्यात आला आहे.या बहुरंगी लोकनाट्य तमाशात पारंपारिक गण, श्रृंगारीक गवळण,आणि शरद ओकटे लिखित काल्पनिक चित्तथरारक वगनाट्य “रक्तरंगण” सादर होणार आहे.कार्यक्रमाला टीव्ही फेम नामांकित संगीतकार यांची साथ,कवी.गायक.शाहिर यांनी स्वरबद्ध केलेली सुमधुर गाणी,असा सदाबहार कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना जणू पर्वणीच ठरणार आहे.नियोजित कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून कोकणातील व मुंबईस्थित कलाप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
अधिक महितीसाठी दिपक कारकर ९९३०५८५१५३,श्री.बापू ओकटे ९००४३०७०७

error: Content is protected !!