जत तालुक्यातील सर्व तलावे म्हैशाळ योजनेच्या टंचाई निधितून भरून घ्यावे- अमित दुधाळ व ज्ञानेश्वर धुमाळ.

नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी- जत तालुक्यामध्ये भयानक दुष्काळ पडलेला असून जनावंराना चारा व पाणी मिळणे कठिण झाले आहे. शेतीला तर नाहीच तर पिण्याचे पाण्याचा प्रश्नही निर्माण झालेला आहे पाण्या अभावी सर्व पिके तर करपून गेले आहेत याचे कारण तालुक्यात पाण्याचा अभाव आहे. म्हणून म्हैशाळ योजनेच्या टंचाई निधितून तालुक्यातील सर्व तलावे भरून घ्यावे असे मत युवासेना जिल्हा उपप्रमुख अमित दुधाळ व युवासेना जत शहर प्रमुख ज्ञानेश्वर धुमाळ यानी निवेदनाद्वारे केली आहेत. जर सर्व तलावे म्हैशाळ पाण्याने भरून घेतले तर तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. तसेच देवनाळ तलावात म्हैशाळचे पाणी सोडून ते पाणी सायपन पध्दतीने सोडल्यास ओडा नाल्यातून देवनाळ मार्गाने पाच्छापूर, सोरडी, सिध्दनाथ, मोठेवाडी तलावे भरून संख तलावामध्ये पाणी जातो त्यामुळे पुर्वभाग सुजलाम सुफलाम होणार आहे. तसेच म्हैशाळचे पाणी बंदीस्थ पाईप लाईनद्वारे न सोडता कँनल खुदाई करून सोडण्यात यावे असे मत शिवसेना युवा जिल्हा उपप्रमुख अमीत दुधाळ व युवा शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर धुमाळ यानी निवेदनाद्वारे केले आहे.

error: Content is protected !!