जत शहर मुस्लीम समाजाच्या वतीने पुलवामा भ्याड हल्लाचा निषेध शहरातून कॅडल मार्च काढून पाकिस्तान चा निषेध

नवचैतन्य टाईम्स जत(नजीरभाई चट्टरकी)काश्मीर मधील पुलवामा जिल्हात पाक दहशतवादीनी भारतीय सेनेतील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर पाक दहशतवाद्यानी केलेल्या भ्याड हल्लाचा निषेध म्हणून जत शहर मुस्लीम समाजाच्या वतीने शहरातून कॅडल मार्च काढून शहीद जवानांच्या प्रती संवेदना व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली.शहराच्या मध्यभागी असणाऱ्या शाहीमशीद परीसरात हजारोच्यां संख्येने मुस्लिम बांधव एकञ येवुन हल्याचा विषय संवेदनशील असल्याने देशावरील प्रेम व देशभक्तीने भारावलेले सर्वधमीॅय अबालवृद्ध ही कॕडल मार्च मध्ये सामील होऊन आपण सर्वजण एकजूट असल्याचे दाखवून दिले.
कॅडल मार्चचे आयोजन प्रतिष्ठीत व्यापारी हाजीबंदेनवाज पटाईत, मकसुदभाई नगारजी,शफिक इनामदार,राजू मुल्ला,माजी नगराध्यक्ष पट्टुगवंडी,सलीम गवंडी,मुन्ना पखाली,फारूख मनियार,आदिच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.यावेळी आमदार विलासराव जगताप. राष्ट्रीय काॅग्रेसचे युवा नेते विक्रम दादा सावंत हाजी रशीदभाई पटाईत,डॉ.अजीम चट्टरकी,उद्योजक मुबारक नदाफ, इंजी,राजु इनामदार, सलीम पाच्छापुरे हाजी एजाज हुजरे,अविनाश वाघमारे,बसवराज चव्हाण शाखा अभियंता बागवान साहेब,के.एम.हायस्कूल चे प्राचार्य रियाजअहमद सय्यद यांच्या सह हजारोंच्या संख्येने मुस्लीम व हिंदू बांधव कॅडल मार्च मध्ये सहभागी झाले थोरली वेस येथून मुख्य बाजार पेठेतून निघून महाराणा प्रताप चौक छ.संभाजी महाराज चौक ,किस्मत चौकामार्गे येवुन मारूती मंदिर येथे शोक सभा पारपडली संतप्त जमावा कडून पाकिस्तान मुर्दाबाद ने घोषणा देत व त्याचबरोबर भारत माता की- जय, वीर जवान अमर रहे-अमर रहे, त्याचबरोबर पाकिस्तानचा निषेध म्हणून पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या.त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितानी या हल्ल्याची निंदा करून पाक मध्ये घुसून दहशतवादीना ठार मारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले

error: Content is protected !!