आवंढ़ी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच आण्णासाहेब कोडग याना लोकमत सरपंच पुरस्काराने सन्मान.

नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी – लोकमत आयोजित बी के टी टायर्स व पतंजलि यांच्या सहयोगाने लोकमत सरपंच पुरस्कार
जत तालुक्याच्या आणि आवंढ़ी गावचे सरपंच आण्णासाहेब कोडग याना सांगली जिल्हाचे पोलिस अधिक्षक शुहेल शर्मा याच्या हस्ते देण्यात आला. त्यामुळे जत तालुक्यातील आंवढी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आवंढ़ी गावचे प्रथम लोकनियुक्त कार्यसम्राट सरपंच आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री आण्णासाहेब कोडग याना सांगली येथे लोकमत परिवारच्या वतीने प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी सांगली जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक मा सोहेल शर्मा ,कोल्हापुर महानगर पालीकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी साहेब, लोकमतचे संपादक वसंत भोसले,सांगली जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राउत साहेब , देशमुख साहेब, नागे साहेब ,लोकमत परिवार आणि आवंढ़ी गावचे उपसरपंच आण्णासाहेब बाबर, सदस्य ,व गावातील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
त्यामुळे आंवढी गावातील सर्व उपस्थित ग्रामस्थानी मोठ्या जोशात जल्लोष साजरा केला.

error: Content is protected !!