मतदान केलेले दाखवा आणि 5 रुपयात हरमन चहाचा आस्वाद घ्या हरमन चहावाला तर्फे मतदारांच्या हक्काला साथ : हरिभाऊ कुलकर्णी

नवचैतन्य टाईम्स सांगली – 100 टक्के मतदान व्हावे या साठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग मोठे प्रयत्न करत आहे. ‘हरमन चहावाला’ नेही या मोहीमेत खारीचा वाटा उचलण्याचे ठरविले आहे. दि 23 एप्रिल रोजी मतदान केलेली बोटावरील शाई दाखविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दिवसभरात कितीही वेळा निम्म्या किंमतीत म्हणजे 5 रुपयात चहा देणार आहोत.अशी माहिती हरमन चहावाला ब्रँडचे मालक हरिभाऊ कुलकर्णी यांनी दिली. संचालक सिद्धार्थ कुलकर्णी हेही यावेळी उपस्थित होते.हरिभाऊ कुलकर्णी पुढे म्हणाले हरमन चहावाला’ हा सांगलीत स्थापन होऊन राज्यभर पसरत चाललेला चहा आउतलेटचा एक नामवंत ब्रँड बनत चालला आहे. त्याच्या सांगली शहरातील 5 आउटलेटसह, मिरजेतील दोन, पलूस, इचलकरंजी, जयसिंगपूर, गांधीनगर आणि पुण्यातील दोन अशा सर्व 13 आउतलेटमध्ये मतदानाच्या दिवशी पूर्ण दिवसभर निम्म्या किंमतीत कितीही वेळा चहा दिला जाईल. मात्र त्यासाठी मतदान केल्याची बोटावरील खूण दाखवावी लागेल.मतदानाचा हक्क प्रत्येक व्यक्तीने बजाववा आणि त्यादिवशी आमच्याकडून हक्काने निम्म्या किंमतीत चहा घ्यावा असे आवाहन आम्ही आमच्या 13 आउटलेट मध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांना करीत आहोत, त्यांनी या उपक्रमाबद्दल आमचे कौतुक केले आणि आपल्या आसपासच्या लोकांना मतदानासाठी उद्युक्त करू असे सांगितले, या उपक्रमाद्वारे आम्ही आमच्या नियमित ग्राहकांना सुद्धा या मोहिमेत जोडून घेऊ शकलो याचा आनंद आहे. मा. जिल्हाधिकारी साहेब, निवडणूक निरीक्षक साहेब, महापालिका आयुक्त साहेब व फूड कमिशनर यांना याची माहिती दिली, त्याबद्दल त्यांनीही कौतुक केले. असे प्रोत्साहनपर उपक्रम समाजातील विविध घटकांनी राबवले तर मतदान शंभर टक्के होण्यास अडचण येणार नाही असेही त्यांनी सांगितले.
आमचा मुलगा सिद्धार्थ हा प्रथमच यंदा लोकसभेला मतदान करणार आहे, त्यामुळे आम्ही यासाठी अधिक उत्सुक बनलो, पहिल्यांदा मतदान करणारे युवक मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांचे मतदान शंभरटक्के व्हावे म्हणजे त्यांना मतदानाची सवय लागेल असे आम्हाला वाटते. त्यासाठी आमची हि कल्पना सर्वाधिक या युवा मतदारांना आकर्शीत करणारी आणि जुन्या मतदार आणि आमच्या ग्राहकांना या प्रक्रियेशी जोडणारी आहे असे आव्हान हरीभाऊ कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

error: Content is protected !!