मुरुड तालुक्यातील जमृतखार गावामधे हनुमान जन्मोत्सवानिमीत्त विविध कार्यक्रम संपन्न

नवचैतन्य टाईम्स मुंबई : ( दिपक कारकर )–मूरुड तालुक्यातील जमृतखार ग्रामस्थांच्या वतीने हनुमान जन्मोत्सवाचा धार्मिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. सलग ६० वर्षाची यशस्वी परंपरा राखत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी पालखी सोहळा पूजाविधी,महाप्रसाद, भजन आदी कार्यक्रमाबरोबर नवी मुंबईतील नामांकित एम्.जी.एम. हॉस्पीटल यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात सामान्य चिकित्सा,मधूमेह,नेत्र तपासणी,बालरोग,अस्थीरोग,नाक कान घसा तपासणी,स्त्री रोग,तसेच रुग्णाची ईसीजी करण्यात आली.या शिबिरात विभागातील एकुण ३८६ रुग्णानी या सेवेचा लाभ घेतला. रुग्णांना तपासणीनंतर एक भेट वस्तू व आवश्यक औषधे देण्यात आली.आरोग्य शिबिराचे उद्घाटन पंचक्रोशी कुणबी समाजाचे अध्यक्ष श्री.मंगेश पाटील समाज सेवक श्री.गजानन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच एम.जी.एम.मधील सर्व डॉक्टरांचे स्वागत वाजत-गाजत करण्यात आले आणि कार्यक्रमाच्या शेवटी सर्व डॉक्टरांचा नयनरम्य असा सत्कार सोहळा गावपाटील महादेव पाटील तसेच ग्रामस्थ आणि महिलांच्यावतीने सन्मानचिन्ह व वृक्ष(रोपटे) देवून पार पाडण्यात आला.
या शिबिराच्या आयोजनासाठी जमृतखार गावातील युवा कार्यकर्त्यांनी व महिलांनी लाखमोलाची मेहनत घेतली.असुन यावेळी मोठ्या संख्येने जमृतखार गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!