ढालगांव जि प मतदारसंघातून अमर शिंदे प्रबळ दावेदार,कार्यकर्त्यांतुनही वाढती मागणी

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे /वार्ताहर(जालिंदर शिंदे)-ढालगांव जिल्हा परिषदेच्या खुल्या गटातून तालुका युवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष व घाटनांद्रे गावचे माजी सरपंच अमर विठ्ठल शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू आसुन,कार्यकर्त्या मधूनही तशी वाढती मागणी जोर धरू लागली आहे.स्व आर आर(आबां) पाटील यांच्या आकस्मित निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती.त्यानंतर स्थापीत झालेल्या युती सरकारच्या काळात तर घाटमाथ्यावरील अनेक मोहरे हे राष्ट्रवादी सोडून भाजपवाशी झाले.त्यावेळी राष्ट्रवादीचीही फार मोठी पडझड घाटमाथ्यावर झाली.परंतु घाटनांद्रेत अमर शिंदे,तिसंगीतुन वामन कदम ,गर्जेवाडीत जेष्ठ नेते प्रल्हाद (बापू) हाक्के,कुंडलापूरातुन दिपकराव चव्हाण,जाखापूरमधून संजय पाटील,कुचीत एम के (दादा) पाटील यांनी एकाकी झुंज देत राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे त्या परिस्थितीत जोम चालूच ठेवला.घाटनांद्रे गावच्या तर झालेल्या गत ग्रामपंंचायतीच्या निवडूणकीत अमर शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निकराची झुंज देत ९ पैकी ५ सदस्य निवडून आणले तर सरपंच पदासाठीचाही अगदी निसटता पराभव त्यांना मान्य करावा लागला.तदनंतर नुकत्याच झालेल्या घाटनांद्रे ग्रामविकास सोसायटी निवडणूक बिनविरोध करून त्यांनी आपले मोठे राजकीय आसतीत्व तालुक्याला दाखवले व सोसायटी राष्ट्रवादीच्या भात्यात जमा केली.ही एक जमेची बाजू ठरली आहे.आजही त्यांच्याकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा खूप मोठा भरणा आहे.याच जोरावर ते जनसामान्यांच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठविताना दिसत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांचा व्होरा आहे.सुझलॉन कर्मचार्यांचा प्रश्न,विजापूर-गुहागर रस्त्यांच्या बाधित शेतकर्यांच्या प्रश्नांविषयी ते आवाज उठवितानाचे दिसत आहेत.कोरोना सारख्या घातक विषाणूच्या महामारीतही त्यांनी जनतेला मोठा आधार देण्याचे काम केले आहे.त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता जनतेच्या न्याय हाक्कासाठी लढणाऱ्या निस्वार्थी असणाऱ्या अमर शिंदे यांच्या नावाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विचार करावा अशी मागणी घाटमाथ्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत.

error: Content is protected !!