म्हैशाळच्या पाण्याची ठेकेदारांकडून चोरी ठेकेदारावर गुन्हे दाखल करावेत : विक्रम ढोणे

शेतकरी बांधवांना एक न्याय व ठेकेदारांना एक न्याय.
नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधीः- जत तालुक्यातील शेतकरी बांधवांनी पैशे भरून म्हैशाळच्या योजनेचे पाणी घेतले पण या पाण्याची चोरी गावपुढारी व ठेकेदारांकडून संगनमतानेच केली जात आहे याला काही अधिकारी व कर्मचारी यांच्या छुपा पाठिंबा आहे या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून चोरी केलेल्या पाण्याचे पैशे वसुल करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे
जत तालुक्यातील तलाव म्हैशाळच्या पाण्याने भरून घेण्यासाठी संबधित तलावाच्या लाभधारक शेतकरी यांनी पैशे भरून पाणी घेतले आहे परंतु ठेकेदारांने गावपुढारी यांना हताशी धरून रोज लाखो लिटर पाण्याची टँकरद्वारे दिवसाढवळ्या चोरी केली जाते परंतु अधिकारी कर्मचारी यांच्याकडे तक्रार करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते पण शेतकरी बांधवांनी पाणी घेतले असता त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल होतात पण ठेकेदारांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जाते हा शेतकरी बांधवांवर अन्याय आहे लवकरात लवकर संबधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करून पाणी उपसा केलेल्या पाण्याचे व्यापारी पध्दतीने पाण्याचे पैशे वसुल करावेत तसेच ठेकेदाराने पाणी मागणी न करताच पाणी उपसा चालु केल्यानंतर शेतकरी बांधवांनी अडविले असता पन्नास हजाराचा डीडी काढला पण तो कशाच्या आधारे काढला व त्या पैशातून किती पाणी उपसा करायचे याचे काहि मोजमाप नाही याकडे दुर्लक्ष करण्याचा अधिकारी यांचा उद्देश काय जी ततत्परता शेतकरी बांधवांना दाखवली जाते ती ठेकेदाराला का नाही त्यामुळे लवकरात लवकर संबधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली यावेळी रासप तालुका प्रमुख किसन टेंगले,संभाजी टेंगले, नवनाथ टेंगले, नानासाहेब भोसले आदि उपस्थित होते

error: Content is protected !!