संत निरंकारी मिशन हे विश्वबंधुत्व निर्माण करणारे मिशन आहे – विजयजी माने खिळेगाव.

नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी – संत निरंकारी मिशन हे विश्व बंधुत्व निर्माण करणारे मिशन असे प्रतिपादन संत निरंकारी मंडळाचे विजयजी माने ज्ञानप्रचारक व सेक्टर संयोजक खिळेगाव यांनी साधसत्संग उमराणी च्या सेवेतुन गुगवाड येथे आयोजित विशाल सत्संग सोहळ्यामध्ये केले.
ते पुढे म्हणाले की एका परमात्म्याची ओळख करून घेणे हे मानवी जिवनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.सर्व धर्मग्रंथांनी ही जगामध्ये देव एक आहे आणी तो सर्व व्यापी आहे विश्वामध्ये भरलेला परमात्मा पाहणे साठी ज्ञानदृष्टिची गरज आहे त्यासाठी जिवनामध्ये सद्गुरु ची नित्तांत गरज आहे.सदगुरु प्रभु परमात्माची ओळख करुन देऊन भक्ती कशी करावी याची रित शिकवतात संत बसवेश्वर,संत ज्ञानेश्वर,संत तुकारम,संत नामदेव महाराज आशा अनेक संत महापुरुषांनी सद्गुरु शिवाय देवाची प्राप्ती होणे आशक्य आहे आणी देवाची ओळख न करता केलेली भक्ती व्यर्थ आहे.युगायुगाला सद्गुरु साकार रुपामध्ये प्रगट होत असतात.सदगुरु परमेश्वराची ओळख करुन देतात सर्व प्राणीमात्राची निर्मीती एका प्रभु परमात्माची आहे आणी मानवता हाच मानवाचा खरा धर्म आहे याची शिकवण देतात आजच्या समयाला सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज याचा अवतार झालेला आहे त्या सर्व मानवमात्रेला एका धाग्यांमध्ये जोडुन विश्वबंधुत्व निर्माण करण्याचे महान कार्य करीत आहेत.
मानवाचा जन्म कशासाठी झालेला आहे.जन्मामध्ये येऊन काय करायचे आहे आणी शेवटी कोटे जायाचे आहे या प्रश्नाचे उत्तर फक्त निरंकारी मिशनमध्ये प्राप्त होते.भक्त आणी भगवंत याची भेट झालेनंतर भक्ती होऊ शकते आदी भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मांतेश पाटील खिळेगाव यांनी केले
कार्यक्रमास तालुक्यातुन मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते नियोजन जत ब्रँच मुखी जोतिबाजी गोरे,सेवादल संचालक संभाजी साळेजी, श्रीमंतजी बिराजदार, शिवाजी जाधव व सेवादार संत महापुरुषांनी केले.

error: Content is protected !!