गंधकुटी बुध्द विहार मुर्तवडे ( बौध्दवाडी )येथे महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन

नवचैतन्य टाईम्स चिपळूण : ( कु.दिपक कारकर) तालुक्यातील मुर्तवडे बौद्धवाडी येथे प्रतिवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होणारा तथागत गौतम बुध्द व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव याही वर्षी दोन दिवस गंधकुटी बुध्द विहार,मुर्तवडे ता.चिपळूण,जि.रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे.या भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समिती ( नोंदणीकृत ) अंतर्गत २७ गांव विभाग शिरवली गट क्रमांक ६, व बौद्ध विकास संस्था मुर्तवडे आणि माता रमाई आदर्श महिला मंडळ ( मुंबई / स्थानिक ) मौजे मुर्तवडे बौद्धवाडी, ता.चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव पार पडणार आहे.बौद्ध विकास संस्था मुर्तवडे, बौद्धवाडी या संस्थेमार्फत गेली अनेक वर्षे विविध सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक उपक्रम ग्रामीण-मुंबई या ठिकाणी राबवले जातात.दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध क्षेत्रात कार्य करणारी मंडळी व मान्यवर यांच्या उपस्थितीत हा जयंती महोत्सव साजरा होत असतो.या वर्षी शुक्रवार दि.१७ मे / १८ मे २०१९ रोजी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.१७ मे रोजी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी,मार्गदर्शक, प्रमुख वक्ते, मान्यवर यांचा सत्कार सोहळा,जाहीर सभा व रात्री ०९:०० वा. ( गणेश पवार आणि गायन पार्टी, पनवेल-मुंबई ) यांचा करमणुकीचा कार्यक्रम सादरीकरण होणार आहे.तर दि.१८ मे रोजी जाहीर धम्मप्रवचन स.११ ते दु.०२ या वेळेत जेष्ठ प्रवक्ते प्रा.विजय मोहिते सर ( सिद्धार्थ विद्यालय पाली विभाग ) उपस्थित जनसमुदाय यांना करणार आहेत.तसेच विद्यार्थ्यांसाठी वक्रूत्व स्पर्धा / निबंध स्पर्धा ,सायंकाळी ४ :०० वा.भव्य मिरवणूक , विद्यार्थी गुणगौरव सोहळा व रात्रौ ०९ :०० वा.विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न होणार आहे.उपरोक्त संस्थेच्या वतीने शनिवार दि.१८ मे २०१९ रोजी मुर्तवडे कातळवाडीतील भूमिपुत्र,फार कमी वयात सामाजिक कार्याची आवड असणारे व्यक्तिमत्व,आजवर सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कु.दिपक कारकर यांना महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय संजीवन पंचरत्न पुरस्कार इंडियन आयकॉन अवार्ड पुरस्कार मिळाले आहेत.अशा युवा समाजसेवक/युवा पत्रकार कु.दिपक धोंडू कारकर यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष गौरव पुरस्कार – २०१९ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.या भव्य दिव्य कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन बौध्द विकास संस्था व माता रमाई आदर्श महिला मंडळ,मुर्तवडे बौद्धवाडीतर्फे करण्यात आले आहे.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.प्रतिक्षा पवार करणार आहे.

error: Content is protected !!