मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिना निमित्त जतमध्ये रूणांना फळ वाटप.

नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी ः- आज १० मे रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रध्येय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिना निमित्त भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जत शहरामधील शासकीय ग्रामीण रुग्णालयामधील उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोफत फळवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच आंबेडकर नगरमधील बौद्ध विहारमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष बंडू काबळे म्हणाले की बाळासाहेबाचे काम वंचित बहुजनासाठी असल्यामुळे बाळासाहेब आंबेडकराचे विचार तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहचवीणार आहे. या उपक्रमासाठी भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष संजय (बंडू) कांबळे, युवक अध्यक्ष सुनील कांबळे, जत शहर युवक अध्यक्ष प्रशांत झेंडे सर, जत तालुका उपाध्यक्ष साहेबराव उबाळे, जत तालुका महासचिव जनार्दन कांबळे, माजी तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ नेते मछिंद्र दादा उबाळे, तालुका संघटक अमित तोरवें, तालुका कार्यकारिणी सदस्य भास्कर माने, स्वप्नील ऐदाळे, रोहित झेंडे, विशाल सनदी, संजय कांबळे, सुभाष कांबळे, राहुल (बंडू) वाघमारे, सोनू साबळे, सुहास वाघमारे, सनी गडीकर, किशोर झेंडे, बंटी कांबळे, संतोष कांबळे, जगन्नाथ कांबळे , आकाश कांबळे, व बाळासाहेबावार प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल रुग्णांनकडून तसेच सर्व कर्मचाऱ्यांकडून आभार व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!