चारा छावण्या ग्रामपंचायतींना चालवण्यास द्या – सरपंच बसवराज पाटील

नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)—-सध्या जत तालुक्यात 1972 सालच्या दुष्काळापेक्षा भयंकर दुष्काळ पडलेला असुन शासन तालुक्यातील संस्थांच्या मार्फत चारा छावण्या चालवण्यासाठी प्रस्ताव मागणी केलेली असता संस्थांनी चारा छावणी चालविण्यासाठी पुढाकार घेतला नसून सदर चारा छावण्या प्रत्येक गावातील ग्रामपंचायत मार्फत चालविण्यात यावे अशी मागणी एकुंडीचे सरपंच तथा सरपंच परिषद जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले आहे.
एवढया भयंकर दुष्काळी परिस्थितीत सुध्दा शासन फक्त कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त असून जत तहसिल कार्यालय व पंचायत समिती कार्यालयातील अधिकाऱ्यांना दुष्काळी परिस्थिती बाबत कोणतीच गांभीर्यपणा नाही. लोकसभा निवडणूकीत प्रशासन ज्या ताकदीने नियोजन करत असते. त्याप्रमाणेच दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन आणि प्रशासन का गांभीर्यपणा दाखवत नाही. सध्या तालुक्यातील जनावरे चारा-पाण्याविणा तडफडून मरण यातना भोगत आहेत व कित्येक जनावरे दगावली असताना चारा छावणी सुरू करण्यासाठी दुष्काळाच्या शेवटच्या क्षणी प्रशासन बैठकावर बैठका घेण्यातच व्यस्त आहेत चारा छावणी चालू करण्यासाठी तालुक्यातील संस्थे मार्फत प्रस्ताव मागवण्यात आले आहेत परंतु चारा छावणी चालवण्याचा मागील अनुभव पाहता बीले वेळेवर न मिळणे, प्रशासनाचा चौकशीवर चौकशीचा फेरा यामुळे चारा छावणी चालवण्यासाठी संस्थांनी नामर्जी दाखवल्याने शासनानाला जर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा खरोखरच कळवळा असेल तर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचा सध्या आदर्श व योग्यरितीने कारभार चालू आहे अशा ग्रामपंचायत कडून शासन १४ व्या वित्त आयोग, ग्रामनिधी, ग्रामस्वच्छता अभियान, पाणीफौंडेशन, जनगणना, घरकूल, शौचालय, पाणीपुरवठा, शैक्षणिक नियोजन यांसह अनेक कामे ग्रामपंचायत मार्फतच चालवत असताना चारा छावणीही ग्रामपंचायत मार्फत चालवल्यास भ्रष्टाचारमुक्त योग्य नियोजन होईल. त्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना जबाबदारही धरता येईल. म्हणून शासनाने चारा छावण्या चालवण्यासाठी गावागावातील ग्रामपंचायतींना द्यावेत अशी मागणी सरपंच परिषदेचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले आहे.

error: Content is protected !!