जत शहरातील नैसर्गिक नाल्यावर होत असलेले बांधकाम तातडीने थांबवावे अन्यथा नगरपरिषदे विरुद्ध हरित न्यायालयात याचिका दाखल करणार : विक्रम ढोणे

नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)—–जत शहरातील नैसर्गिक नाल्यावर होत असलेले बांधकाम तातडीने थांबवावे अन्यथा नगरपरिषदेच्या विरूध्द मे हरित न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती विक्रम ढोणे व राहूल शिंदे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडेच निवेदनाद्वारे केली आहे जत शहरातील पुर्वीच्या नकाशाप्रमाणे असणारे नैसर्गिक नाले स्वच्छता करून पाणी प्रवाहित करण्यासाठी व दुष्काळाची दाहकता दिवशेदिवस वाढत असताना शहरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत पुनर्जीवीत करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने पुढाकार घेऊन ओढे नाले स्वच्छ केले व तोच नैसर्गिक नाला आता नगरपरिषदेच्या प्रशासन व त्या नैसर्गिक नाल्याचे सिमेंट काँक्रीटच्या गटारीमध्ये रूपांतर करित आहेत व ते शहराच्या भविष्याचा विचार करता शहरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे.नैसर्गिक ओढा, नाला अथवा नदीच्या पात्रास अडथळा आणणे हे काम घटनेच्या विरूध्द आहे, तो सामाजिक गुन्हा आहे निसर्गाचा गळा घोटून विकास करता येणार नाही शासन एकीकडे नैसर्गिक नाले व पाण्याचे स्रोत पुनर्जीवीत करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे आणि नगरपरिषद प्रशासन शासनाच्याच धोरणाला हरताळ फासण्याचे काम करत आहेशहराच्या भविष्यातील पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची खबरदारी नगरपरिषद प्रशासनाने घेऊन पुर्वीच्या नकाशाप्रमाणे असलेले सर्वच नाले व नाल्यातील चालु असलेले शिवाजी पेठेतील होंडा शोरूम ते रोहिदास नगर येथील नाल्यातील गटार बांधकाम तातडीने थांबवावे अन्यथा नगरपरिषदेचे विरूध्द मे.हरित न्यायालय पुणे येथे याचिका दाखल करण्यात येईल अशी मागणी युवक नेते विक्रम ढोणे व सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडेच निवेदनाद्वारे केली आहे.

error: Content is protected !!