लिट्ल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
नवचैतन्य टाईम्स उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी(आशा वाघ)लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांचे पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने लिट्ल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळेमध्ये साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लिट्ल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय पवार हे होते. लोकमान्य टिळक, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व भारत माता यांच्या प्रतिमांचे पूजन श्री संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी तील बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने व अभ्यासपूर्ण अशी भाषणे केली.या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक श्रीमती अनिता कदम, श्रीमती सुनिता शिंदे, श्रीमती वनिता कारंडे, श्रीमती अरुणा कुंभार, श्री तुकाराम चव्हाण, श्री शिवाजी कारंडे, श्री संतोष शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील सांस्कृतिक विभाग श्री संतोष शिंदे व श्रीमती अरुणा कुंभार यांनी केले.