माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी जतकडे पाठ फिरवत दुष्काळग्रस्तांची क्रूरचेष्टा केली-अजित पाटील

नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी-
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, सिद्धाराम म्हेत्रे यांनी दुष्काळी जत तालुक्याकडे पाठ फिरवत दुष्काळग्रस्तांची क्रूरचेष्टा केली असल्याची टीका रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील यांनी केला.
जत तालुक्यातील चारा छावणीना भेटी देऊन दुष्काळी भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री व मंत्री येणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. मात्र प्रत्येक्षात सकाळचा साडे दहाचा दौरा कोणीही येत नाही हे दिसताना दुपारी दोन वाजता आ.विश्वजित कदम, भारत भालकेना बोलावून घेऊन नौटंकी करत दौरा केल्याचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकला हे फक्त फोटोसेशन करण्यासाठीच दौर केला. दुष्काळाचे कोणतेही गांभीर्य नसणाऱ्या काँग्रेसची सत्ता केंद्रात, राज्यात नसताना म्हणजे काहीही काम राज्यातील काँग्रेस नेत्यांना नसताना आमच्या तालुक्यातील भीषण दुष्काळाची परिस्थिती पाहायला व विरोधक म्हणून दुष्काळावर आवाज उठवायला वेळ नाही. मग काँग्रेस नेते आमच्या तालुक्याला काय न्याय देऊ शकतात. जत तालुक्यामधील समस्या शेतकऱ्याकडून जाणून घेण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जत तालुका दौरा केला. आणि मुख्यमंत्र्यांना वस्तूस्थितीचा आढावा देत चारा छावणीच्या अटी शिथिल करणे, जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र टँकर, छावणीतील जनावरांच्या अनुदानात वाढ, शेळया-मेंढ्याना स्वतंत्र चारा छावणीची गरज, रोजगार हमीच्या कामांना तात्काळ मंजुरी देऊन लोकांना काम देणे गरजेचे असल्याचा लेखी अहवाल उपसमितीने दिला. उपसमितीच्या अहवालानुसार मंत्री मंडळाच्या बैठकीत सर्व मागण्याची दखल घेऊन शासनाने निर्णय घेतला. मात्र तालुक्यातील काँग्रेस नेते पत्रकार परिषद घेऊन मंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका करण्यात धान्यतः मानतात. खरेच काँग्रेस नेत्यांना तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना न्याय द्यावा वाटत असता तर पत्रकार परिषदा घेऊन टीका टिपणी करण्याऐवजी हिम्मत दाखवून रस्त्यावर उतरून आंदोलन करायला पाहिजे होते. परंतु काँग्रेस नेत्यांना दुष्काळाचे राजकारण करायचे असल्याने ते फक्त स्टंटबाजी करण्यातच माहेर असल्याची टीका रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील यांनी केली.
यावेळी रासपचे जिल्हाध्यक्ष मारुती सरगर, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पांडुरंग धडस, तालुकाध्यक्ष किसन टेंगले, उपाध्यक्ष लक्ष्मण पुजारी, शहराध्यक्ष भूषण काळगी, अल्पसंख्याक आघाडीचे आकिल नगारजी, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष ओंकार बंडगर
उपस्थित होते.

error: Content is protected !!