डंपरच्या दडकेत बाजार समितीचे कमान जमिनदोस्त

नवचैतन्य टाईम्स जत-(नजीरभाई चट्टरकी)— जत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भरवण्यात येणाऱ्या जनावर बाजारच्या मुख्य प्रवेशद्वारा ला एका डंपरने जोरदार धडक दिल्याने संपूर्ण कमान डंपरच्या केबिनवर कोसळून चालक गंभीर रित्या जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारार्थ जत ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शनिवारी संध्याकाळी ७ वाजता घडली. सध्या त्या चालक ची प्रकृती सुधारत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की अथणी येथील एस.के.सावडकर यांच्या मालकीचे डंपर क्र KA-23-A-8973 मधून जनावर बाजारा आवारात सुरू असलेल्या बांधकामवर कृञिम वाळू (क्रशिंग शांड) खाली करण्यासाठी डंपर आत गेला होता डंपर चालक सुरेश नागप्पा मडेपगोळ वय ३० राहणार रामतिर्थ ता.अथणी जिल्हा.बेळगाव दारूच्या नशेत असल्याने डंपर चा मागिल हौदा त्याने खाली न उतरवता,वर उचललेल्या स्थितीत तसेच जोरात डंपर बाहेर काढत असताना कमानीच्या वरच्या बीमला वर उंचावलेला हौदा धडकल्याने संपूर्ण कमनीचा सांगाडा डंपरच्या समोरील केबीन वर आदळला व केबीन सह संपूर्ण डंपरचे मोठे नुकसान झाले. डंपर चालक माञ चमत्कारित्या या दुर्घटनेतुन बचावला आहे या घटने बाबत माकेर्ट यार्डचे सचिव सोमनिंग चौधरी यांच्याशी संपर्क साधले असता ते म्हणाले की बाजार समितीचा काही एक संबंध नाही तर सध्या जनावर बाजार आवारात डाळिंब खरेदी विक्री केंद्र सुरु करण्यासाठी इमारत बांधकाम सुरु आहे, संपूर्ण बांधकामाचे टेंडर खोत या ठेकेदाराला दिले आहे.ते काम त्यांना दिल्याचे त्यांनी ते कमान आहे तशी उभी करून देतील असे त्यांनी सांगितले या घटनेची जत पोलीसात रात्री उशिरा पर्यंत नोंद झालेली नव्हती. .

error: Content is protected !!