घाटनांद्रे येथील सुरेखा गजानन शिंदे यांचे दुःखद निधन

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील सौ सुरेखा गजानन शिंदे (वय-५७) यांचे सोमवार दि १ ऑगस्ट रोजी सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखद निधन झाले.त्या कुची जिल्हा परिषद शाळा-२ मध्ये मुख्याध्यापिका पदावर कार्यरत होत्या.तसेच शिक्षक बॅंकेच्याही त्या माजी संचालक होत्या.त्यांनी ती जबाबदारी अगदी उत्कृष्ट रित्या पार पडली होती.कवठेमहांकाळचे माजी केंद्र प्रमुख गजानन सुखदेव शिंदे यांच्या त्या सुविध पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती,मुलगा,दोन मुली,जावाई व नातवंडे आसा परिवार असुन,रक्षाविसर्जन बुधवार दिनांक ३ रोजी सकाळी ९ वाजता कवठेमहांकाळ येथे घेण्यात आले आहे.

error: Content is protected !!