एकुंडीचे सरपंच बसवराज पाटील यांना जत तालुका आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

नवचैतन्य टाईम्स जत(प्रतिनिधी)—महाराष्ट्र राज्यातील सरपंच यांच्या अधिवेशनात दि.२८ मे २०१९ मंगळवार रोजी शांतीकमल हॉटेल शिर्डी येथे राज्यस्तरीय आदर्श सरपंच व उद्योजक पुरस्कार वितरण व सन्मान सोहळ्यात सांगली जिल्ह्यातील जत तालुका एकुंडी ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच बसवराज पाटील यांना राज्यातील हजारो सरपंचांच्या उपस्थितीत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या हस्ते जत तालुका आदर्श सरपंच पुरस्कार सन्मान चिन्ह सन्मान पत्र, शाल श्रीफळ देवुन सन्मानित करण्यात आले.यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदाचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.पी मुगळीकर, ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे, यादवराव पावसे, लालुशेठ दळवी, राज्यातील कार्यकारिणी, विभागीय, जिल्हा, तालुका, पदाधिकारी सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!