आरोपीस अटक करण्यात गेलेल्या पोलीसाला जबर मारहान

नवचैतन्य टाईम्स जत(शशिकांत कुलकर्णी)— जत शहरातील सातारा रस्त्यानजीक पारधी तांडा येथील अटक वॉरंट असलेल्या आरोपीला पकडायला गेलेल्या पोलीसावर अारोपीच्या अनोळखी दोघां समर्थकांनी हल्ला केला त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. प्रवीण शहाजी पाटील असे जखमी पोलीसाचे नाव आहे.घटना मंगळवारी 12.30 वाजता घडली.याबाबत सुभाष दिलीप काळे,वय-45,रा.पारडी तांडा जत यांच्या विरोधात जत पोलीसात गुन्हा दाखलझालाआहे.संशयित हल्लेखोर फरारी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी:जत शहरातील पारधी तांड्यातील विविध गुन्ह्यात आरोपी असलेला आरोपी सुभाष काळे यांच्या विरोधात न्यायालयाने तीन अटक वॉरट बजावले होते. जत पोलिस ठाणे अंतर्गत कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील व संदिप सांळुखे यांना सुभाष काळे हा निदर्शनास आला.त्यांनी तातडीने त्यांच्याजवळ जाऊन तुमच्या विरोधात अटक वॉरट आहे.तुम्हाला पोलीस ठाण्याला यावे लागेल असे सांगताच संशयित आरोपी काळे यांनी मी तुमच्याबरोबर येणार नाही काय करायचे ते करा असे म्हणून जमाव जमवून मोठमोठ्याने आरडाओरडा केला व पळून जाऊ लागला यावेळी कॉन्टेबल प्रवीण पाटील यांनी त्याला पकडले.त्यातून त्यांने हिसका देत सुटका करत पळ काढला.दरम्यान पाटील व सांळुखे यांनी त्यांचा पाटलाग केला.त्यावेळी त्याचे समर्थकांनी पाटील व सांळुखे वर हल्ला केला.पाटील यांना काठ्यानी मारहाण करून जखमी केले.या संधीचा फायदा घेत वॉरटमधील आरोपी व मारहाण करणारे संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले.दरम्यान कॉन्टेबल पाटील यांना जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारार्थ मिरज येथे हलविण्यात आले आहे.दरम्यान सुभाष काळे व अन्य २ अनोळखी 18 ते 19 वयोगटातील युवकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा,पोलीसावर हल्ला आदी कलमाखाली गुन्हा दाखल झालेला असुन अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करीत आहेत

error: Content is protected !!