जत तालुक्यातील एकुंडी येथील श्रीशैल बिळुर यांच्यावर तलवारीने खूनी हल्ला.

नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी – जत तालुक्यातील एकुंडी येथील श्रीशैल निंगाप्पा बिळुर वय 35 यांच्यावर कृष्णाप्पा सदाशिव वळसंग वय 28 याने उसने दिलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून तलवारीने डाव्या हातावर सपासप 9 वार करून गंभीर जखमी केले आहे. सदर घटना सोमवार दिनांक 20 मे रोजी एकुंडी येथील पाझर तलावा जवळ घडली असून जखमी श्रीशैल यास मिरज सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली असून सदर घटनेबद्दल श्रीशैल बिळुर यांच्या भावाने जत पोलिसात फिर्याद दिले आहे. संशयित आरोपी कृष्णाप्पा सदाशिव वळसंग याच्या विरोधात कलम 326 नुसार जत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. सदर आरोपीला जत पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही..

error: Content is protected !!