चारा छावण्यांना आता तालुकास्तरावर परवानगी-कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

नवचैतन्य टाईम्स जत(शशिकांत कुलकर्णी)— जत व कवठेमहांकाळसह जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी खासदार संजय(काका) पाटील आणि मी थेट बांधावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी युती सरकार ठामपणे उभे असून आता चारा छावण्याच्या परवानगीसाठी तालुकास्तरावर निर्णय घेण्यात येईल,असे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जत तालुक्यातील अनेक भागात दौरा करताना दिले.तालुक्यातील लोहगाव,आवंढी,अंतराळ या ठिकाणच्या चारा छावण्यांना भेटी दिल्या. व लोहगावला आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना मंत्री खोत म्हणाले,चारा छावण्यावरील जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्यावतीने पाण्याचे टँकर उपलब्ध केली जातील,असे स्पष्ट करताना त्यांनी 1982 पेक्षाही हा दुष्काळ भयंकर असून शासकीय अधिकाऱ्यांनी कार्यालयापेक्षा आता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी थेट बांधावर जाण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.आक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना आपत्ती निवारण निधीतून बागायती क्षेत्र व कोरडवाहू शेतीसाठी अनुक्रमे 6800 रुपये व तेरा हजार रुपये तसेच फळबागांना 18500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत.केंद्र सरकारने पाण्याच्या समस्या कायमची सोडविण्यासाठी स्वतंत्र असे जलमंत्रालय स्थापन करण्याची ऐतिहासिक निर्णय प्रधानमंत्री मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जत तालुक्यातील सर्व प्रकारच्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे.यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी चारा छावण्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.यावेळी खासदार संजयकाका पाटील,आमदार विलासरावजी जगताप प्रदेश कार्यकारी सदस्य डॉ रविंद्र आरळी रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाशरावजी जमदाडे जिल्हा परिषद सभापती तम्मनगौडा रविपाटील भाजप तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी जि.प सदस्य सरदार पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

error: Content is protected !!