लॉटरीचे आमिष दाखवून युवकास 31 लाखांची फसवणूक उमराणी ता.जत येथील प्रकार

नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)—-उमराणी ता.जत येथील अनिल ईश्वर वाली वय 39 यांस जॉन स्टिफन (बनावट नाव असावे) या व्यक्तीने2 कोटी 65 लाखांची लॉटरी लागली आहे असे सांगून 31 लाख 30 हजाराची फसवणूक केली असल्याचे उघडकीस आले आहे
जत पोलीसानी दिलेली माहिती अशी,सॅमसंग गॅलेक्सी नॅशनल लॉटरी मध्ये 2 कोटी 65 लाखांची लॉटरी लागली आहे. असा मेसेज वाली यांना स्टिफिन यांनी पाठवला. हा प्रकार 4 डिसेंबर 2017 पासून पुढे सुरू झाला.त्या मेसेजमध्ये तुमच्या अकाउंट ची डिटेल पूर्ण माहिती देण्यास सांगितले होते. अडीच कोटीची लॉटरी लागल्याने अनिल वाली यांनी तात्काळ आपल्या बँकेचे सर्व माहिती त्यांच्या मेलवर पाठवून दिली. दुसऱ्या दिवशी अनिल वाली यांना फोन आला जॉन स्टिफिन बोलत आहे तुम्ही दिलेली सर्व माहिती मिळालेली आहे .मी दिलेल्या बँक खात्यावर २०हजार रुपये भरा. पैसे भरल्यानंतर तुम्हाला लॉटरीचे पैसे मिळायचे लिंक देतोय. असे सांगितल्याने वालीनी वीस हजार भरले . लिंक ओपन केल्यानंतर या लिंकला कोड होता. हा कोड ओपन करण्याकरता दीड लाख रुपये भरावे लागतील. दीड लाख रुपये भरल्यानंतर हा कोड ओपन होईल असे वाली यांना फोन करून सांगितले. तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेत खातरजमा करा असे सांगितले. वाली यानी खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले .तुमचे खाते सेव्हिंगचे आहे. त्यामुळे पैसे जमा होणार नाहीत असे सांगितले गेले .त्यावर वाली यांनी तुम्हाला दुसरा नंबर देऊ का अशी विचारणा केली.असता त्याने दुसरे खाते नंबर चालणार नाही यावर उपाय म्हणजे तीन लाख भरा मी मास्टर कार्ड पाठवतो असे सांगितले. वाली यांनी तीन लाख भरले असाच प्रकार होता वारंवार होत गेला. अनिल वाली यांना खात्यावर अडीच कोटी मिळण्याच्या नादात 31 लाख तीस हजार रुपये जमा केले आहेत. अडीच कोटी मधले एकही रुपया न मिळाल्याने आणि जत पोलीस पोलिसात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे वाली यांना लॉटरीचे आमिष दाखवून स्टिफिन या व्यक्तीने वारंवार वेगवेगळ्या नंबर वरून फोन करून वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरावे असे सांगितले आहे. हा प्रकार गेली दीड वर्ष सुरू आहे. पैसे भरलेले खाते कोणाचे आहे याचा तपशील संबंधित बँकेकडे मागितलेला आहे या घटनेचा तपास जत पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सायबर क्राईम मदत घेऊन अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!