जत विधानसभा लढवणार – सभापती तम्मानगौडा रवीपाटील.

नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी- जत तालुक्याचे पाण्याचे प्रश्न व अनेक समस्या सोडविण्यासाठी सामान्य जनतेच्या जिवावर जत विधानसभा लढवणार असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती तम्मानगौडा रवीपाटील यानी पत्रकार परिषदेत दिली यावेळी भाजपचे जत तालुका अध्यक्ष चंद्रकात गुड्डोडगीपाटील उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की लोकसभेला निवडणूकीत खासदार संजय पाटील यांना जत तालुक्याने भरभरून मते दिली, याचे श्रेय भाजपचे कार्यकर्ते, बुथप्रमुख व शक्तीकेंद्र यांना आहे ते श्रेय इतरानी घेऊ नये असे टोला हि रवीपाटील यानी लगावला. तालुक्यात भाजप वाढविण्यामध्ये सिंहाचा वाटा आमचा आहे तसेच केंद्रातील व राज्यातील योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम प्रामाणिकपणे आम्ही केलो आहे. जे भाजप पक्ष मानत नाहीत त्याना पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा अधिकारच नाही म्हणून मी भाजप पक्षाकडे उमेदवारी मागणार आहे. पुर्वभागातील ४२ गावाना तुबचीबबलेश्वर योजनेतून पाणी मिळावे म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी व पाणीपुरवठा मंत्री डि के शिवकुमार यांना अधिवेशनात निवेदन दिलो त्याचा पाटपुरावा चालू आहे तसेच महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन याना भेटून अंतरराज्य कारार करावा म्हणून विनंतीही केलो आहे. जत तालुक्याला म्हैशाळचे पाणी व तुबचीबबलेश्वराचे पाणी मिळावे म्हणून मी संघर्ष करत आहे. म्हणून सर्व सामान्य जनतेला घेऊन जतची विधानसभा निवडून लढवणार असल्याची घोषणा रवीपाटील यांनी दिली.

error: Content is protected !!