महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती चे मुंबई आझाद मैदानावर जोरदार निदर्शन

नवचैतन्य टाईम्स जत(नजीरभाई चट्टरकी)—– –
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने मंगळवारी मुंबई येथील आझाद मैदानावर विविध प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने करून मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात आले. संतप्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी केंद्र व राज्यातील सरकार विरोधी मुर्दाबाद च्या घोषणा आंदोलनादरम्यान देत होते.या मध्ये सुमारे ५००० अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्याप्रमाणे केंद्रीय मानधनवाढीची अंमलबजावणी,व इतर राज्या प्रमाणे मानधन व मानधनाच्या निम्मी मासिक पेन्शन या प्रमुख मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली.महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी महाराष्ट्र कृती समितीचे एम.ए.पाटील, शुभा शमीम,दिलीप उटाणे,कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील आदींचे शिष्टमंडळाने भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. चर्चेमध्ये महिला व बालविकास विभागाचा कार्यभार असलेल्या सचिव विनिता वेद सिंघल, आयसीडीएस आयुक्त इंद्रा मालो व अन्य अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय मानधनवाढ पूर्णपणे देण्याचे माननीय मंत्री महोदयांनी मान्य केले व त्यासाठीच्या आर्थिक तरतुदीसाठी त्याच दिवशी मुख्य सचिवांशी कृती समितीच्या प्रतिनिधींसमवेत बैठक आयोजित करण्याचे त्यांनी मान्य केले. ही बैठक माननीय मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या कक्षात आज सायंकाळी झाली व त्यात १९ जूनला प्रशासकीय बैठक घेऊन मानधनवाढीचा प्रस्ताव अंतिम करण्याचे व आर्थिक तरतुदीसाठी पावसाळी अधिवेशनात मांडण्यास मान्यता दिली. तसेच कृती समितीने दिलेल्या मासिक पेन्शनच्या प्रस्तावावर गांभिर्याने विचार करण्याचे मान्य केले. या प्रस्तावाच्या आधारावर प्रशासकीय प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी आयुक्तालयाला देण्यात आली. हा प्रस्ताव १९ जूनच्या प्रशासकीय बैठकीत चर्चा करून अंतिम करून मंत्रीमंडळासमोर ठेवण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली.मानधनवाढ व पेन्शन पदरात पाडून घेण्यासाठी कृती समितीमधील सर्व संघटनांनी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेऊन निदर्शनांचा समारोप करण्यात आला.यावेळी अंगणवाडी महिला व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

error: Content is protected !!