मेंढेगीरी येथे दानशूरांन कडून धान्य वाटप – सरपंच प्रकाश पाटील.

नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी – जत तालुक्यांमध्ये मेंढेगिरी ग्रामपंचायत येथे गरिब व गरजू कुठूंबाना धान्य वाटप करण्यात आले.कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर खबरदारी म्हणून विविध उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात देखील विविध उपाय योजनां ग्रामिण प्रशासनाकडून राबविले जात आहेत. या कोरोनामुळे देश लाँकडाऊन झाला असल्यामुळे अनेक लोकांच्या हाताना काम नाही कामेही बंद आहे. म्हणून असल्या काही गरीब व गरजू लोकांना हातभार म्हणून मेंढेगिरीचे सरपंच प्रकाश पाटील, माजी सरपंच सुभाष बिरादार, माजी उपसरपंच श्रीदेवी कट्टीमाणी, ग्रामसेवक के एस ऐवळे, पत्रकार राजू ऐवळे, रोजगारसेवक चिदानंद ऐवळे यांच्या विषेश सहकार्याने दानशूर लोकांनकडून पाच किलो आटा, पाच किलो तांदुळ, एक किलो तेल, एक किलो बेसन, एक किलो डाळ, एक किलो साखर, चहा पावडर, साबन, असे संसारउपयोगी वस्तूची वाटप करण्यात आली.
यावेळी विशेषकरुन धान्य वाटप करताना शासनाच्या आदेशाचे पालन करून सोशेल डिस्टिंगशेन पाळून धान्य वाटप करण्यात आली.

error: Content is protected !!