हंगरगा शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ

नवचैतन्य टाईम्स उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी(आशा वाघ)तुळजापूर : दि. 9 ऑगस्ट रोजी तुळजापूर – नळदुर्ग रोड वर तुळजापूर हंगरगा शिव रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये एका अज्ञात वेक्तीचा मृतदेह 9 ऑगस्ट ला आढळून आल्याने,परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.हा घात कि अपघात हे अजून स्पष्ट झालेलं नाही.मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.परिसरातील नागरिकांतून माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे,पोलीस उपनिरीक्षक बसवेश्वर चनशेट्टी पोलीस हवालदार विजय राठोड,पोलीस हवालदार लोखंडे,चालक रवी शिंदे,व नगरपरिषद कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.विहिरीतून मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

error: Content is protected !!