तुळजापूरात स्वराज्य संघटनेच्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण सोहळा संपन्न

नवचैतन्य टाईम्स उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी(आशा वाघ) उस्मानाबाद- छत्रपती संभाजी राजे यांनी घोषणा केलेल्या स्वराज्य संघटनेच्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण मंगळवारी दि.9 रोजी तुळजापूर येथे तुळजाभवानी च्या दरभरामध्ये अनावरण करण्यात आले.शेतकरी,कामगार.सहकार, शिक्षण,आरोग्य या पंचसूत्री चे व्हिजन घेऊन ही संघटना मैदानात उतरली.छत्रपती संभाजी राजे यांचे तुळजापूर नगरीत आगमन होताच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण केले. दि. 9 रोजी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन स्वराज्य संघटनेच्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांच्या साक्षीने करण्यात आले.मागच्या वेळी तुळजापूरात आलो असताना मंदिरामध्ये गैरसोय झाली. त्याबद्दल व्यक्त होत असताना,संभाजीराजे म्हणाली किमी मोठा नाही,घराणं मोठं आहे.मराठवाडा हा नेहमी दुष्काळवाडा म्हणून हिंनवलं जात.पश्चिम महराष्ट्रातलं वाया जाणार पाणी मिळविण्यासाठी मराठवाड्या तील सर्व खासदार व आमदार एकत्र येत नाहीत.का एकत्र लढा देत नाहीत,पण स्वराज्य संघटना नक्की दुष्काळ मराठवाड्यासाठी काम करेल, असा विश्वास छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी दिला.यावेळी युवराज शहाजी राजे छत्रपती,मुख्य प्रवक्ते करण गायकर, आपासाहेब कुडेकर, गणेश कदम,सज्जनराव साळुंखे,राम कदम,महेश इंगळे,जीवनराजे इंगळे, अजय साळुंखे,आपासाहेब कापसे,प्रशांत कदम,अर्जुन साळुंखे, आण्णासाहेब क्षीरसागर,हजारो शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!