पांचगणी बिलीमोरया हायस्कूल मध्ये भिषण आग

नवचैतन्य टाईम्स महाबळेश्वर प्रतिनिधी :-  (बाजीराव उंबरकर/राजेंद्र कदम)                                     मंगळवार दिनांक २१ रोजी सकाळी साडेनऊ च्या सुमारास पांचगणी येथील बिलीमोरया या इंग्रजी माध्यम हायस्कूलच्या इमारतीस भीषण आग लागली . या आगित मालमत्तेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे .      प्रथम दर्शनी ही आग शॉर्टसर्किट मुळे लागली असल्याचे समजते.आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने यामध्ये विद्यार्थ्यांचे शालेय साहित्या बरोबर हायस्कूलचे लाकडी फर्निचर आणि कॉम्पुटरचे साहित्य जळून खाक झाले आहे.                                                             अचानक शॉर्टसर्कीट झाल्यामुळे आग लागली गेली. पांचगणी नगराध्यक्ष नगरपालिका प्रशासना, लोकप्रतिनिधी , पोलिस प्रशासन यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दल पांचगणी, महाबळेश्वर ,भुईंज यांना पाचारण करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.शाळेला सुट्टी असल्याने सुदैवाने कोणतीही या आगीत जिवीत हानी झाली नाही.

error: Content is protected !!