प्राथमिक शिक्षण विभागातील मंजूर रिक्तपदे त्वरित भरावे- मा विक्रम ढोणे.

नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी – जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील मंजूर रिक्तपदे पूर्ण क्षमतेने त्वरित भरणेत यावीत अशी मागणी विक्रम ढोणे यानी केली. ते आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून आपल्या कार्यकर्ते समवेत जत पंचायत समिती समोर बोंबाबोंब आंदोलन केले. या बाबत माहिती अशी की दुष्काळी जत तालुक्यात अनेक सुविधांचा दुष्काळ असताना तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अनेक पदे गेली अनेक वर्षे रिक्त आहेत. ही रिक्तपदे ताबडतोब भरावित या साठी तालुक्यातील अनेक संघटनानानी शासनदरबारी मागणी केली होती. परंतु सरकारकडून या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले. जत तालुक्यात गटशिक्षणाधिकारी यांचे मंजूर पद एक आहे. तर रिक्तपद ही एकच आहे.विस्तार अधिकारी यांची मंजूर पदे पाच असताना रिक्तपदे तीन आहेत. केंद्रप्रमुख मंजूर पदे अठ्ठाविस असताना रिक्तपदे चौदा आहेत. शिक्षक संख्या मंजूर पदे एकहजार पाचशे अठरा असताना रिक्तपदे दोनशे अष्ठयाहत्तर आहेत. कायम दुष्काळी व विस्ताराने मोठ्या असलेल्या जत तालुक्यात शिक्षण विभागातील अनेक पदे गेली अनेक वर्षापासून रिक्त असून ती तातडीने भरावीत. जत पंचायत समिती शिक्षण विभागाला जुलै 2016 पासून गटशिक्षणाधिकारी नाही. प्रभारी गटशिक्षणाधिकारी हेच कारभार चालवितात. तालुक्यात एकूण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 437,एक शिक्षकी शाळा 102,शुन्य शिक्षकी शाळा पाच अशी शिक्षणाची अवस्था आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती हे तालुक्यातील असतानाही तालुक्यातील शैक्षणिक विभागाची ही अवस्था आहे. शिक्षण विभागातील रिक्तपदामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी शिक्षण विभागाने तालुक्यातील शिक्षण विभागातील सर्व रिक्तपदे ताबडतोब भरावित या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखाली हे बोंबाबोंब आंदोलन करण्यांत आले. या आंदोलनात शिंगणापूरचे सरपंच आण्णासो पांढरे, माजी सरपंच आबासाहेब पांढरे, ग्रा.पं.सदस्य आबासाहेब पांढरे, रा.स.प.विद्यार्थी आघाडी अध्यक्ष ओंकार बंडगर, विलास सरगर, विभिषण इंगळे, सिद्धू सरगर, गणेश साळे, ग्रा. पं.सदस्य नानासाहेब पांढरे, प्रकाश चौगुले, विकास लेंगरे त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे सरकार, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, नाथा पाटील, शिवसेनेचे नेते शिवाजीराव पडोळकर, बंटी दुधाळ यानी पाठींबा दिला.

error: Content is protected !!