स्वंतत्र व्यवसाय केव्हाही चांगला- मा.रोहितदादा आर आर (आबा) पाटील

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-युवकांनी नोकरीच्या मागे लागुन वेळ दौडण्या पेक्षा स्वताचा केलेला स्वतंत्र व्यवसाय हा केव्हाही चांगला आसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहितदादा आर आर (आबा) पाटील यांनी वाघोलीफाटा (ता कवठेमहांकाळ) येथे ‘हाॅटेल गावकरी’च्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.अध्यक्षस्थानी तिसंगीचे माजी सरपंच वामनराव कदम होते.यावेळी बोलताना रोहितदादा पाटील पुढे जाऊन म्हणाले की युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतंत्र व्यवसाय सुरू करुन नोकरी निर्माण करते बनून स्वता बरोबरच इतरांनाही रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे आसेही ते म्हणाले.तर व्यवसायातूनच उद्योग निर्मितीचे केंद्र बनत असल्याने यामुळे परीसराचाही विकास होत आसल्याचे मत माजी सरपंच वामनराव कदम यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी तिसंगीच्या सरपंच रोहिणी सावळे,उपसरपंच शरद जाधव,कुंडलापुर सोसायटीचे चेअरमन दिपकराव चव्हाण,जेष्ठ नेते प्रल्हाद (बापू) हाक्के ,घाटनांद्रेचे माजी सरपंच अमर शिंदे,वाघोलीचे युवा नेते दिपकदादा शिंदे,तिसंगीच्या ग्रामपंचायत सदस्या मयुरी जाधव,हरीराम कदम,विशाल कदमसह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत हरीराम कदम यांनी तर आभार विशाल कदम यांनी मानले.

error: Content is protected !!