कवठेमंहाकाळ येथील शोभा जाधव या बेपत्ता असल्याची पोलिसात नोंद

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) – सौ शोभा भगवान जाधव (वय-६०)राहणार जतरोड कराळे दुकानाच्या पाठीमागे कवठे महांकाळ येथील रहात्या घरातून शनिवार दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरातील कोणालाही काही न सांगता निघून गेल्या आहेत.तश्या आशयाची तक्रार मुलगा राजेश भगवान जाधव (वय-४५) यांनी कवठेमहांकाळ पोलिसात दिली आहे.कवठेमहांकाळ पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की सौ शोभा भगवान जाधव (वय-६०) या शनिवार दि २० रोजी दुपारी अडीच वाजता घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्या आहेत.त्यांचा रंग हा सावळा असुन,चेहरा गोल,नाक लांब तर बांधा सडपातळ आहे.अंगात पोपटी रंगाची साडी आहे तर गळ्यात मंगळसूत्र आहे.त्यांना मराठी बोलता येतो सदर व्यक्ती कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन अथवा किरण जाधव मो – ९९७५२२६६२१,विलास जाधव मो – ९२०९३१०६२६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!