श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयामध्ये नोकर भरती मेळावा संपन्न
नवचैतन्य टाईम्स फलटण प्रतिनिधी(दिनेश लोंढे)-नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल आणि आयसीआयसीआय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव मा.डॉ.श्री.सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) उपस्थित होते. त्याचबरोबर या मेळाव्यात मार्गदर्शक म्हणून आयसी आयसी आय बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री.निरंजन मोहिते,असिस्टंट मॅनेजर श्री.अशिष राऊत आणि एच आर मॅनेजर सौ.आरती राजन उपस्थित होत्या.यावेळी मा.श्री.डॉ.सचिन भैय्या यांनी महाविद्यालयीन युवक हा सामाजिक व्यवस्थेतला एक उत्तम घटक बनावा या उद्देशाने संस्था व महाविद्यालय सतत विविध उपक्रम राबवित असते,याचा सर्वांना लाभ होत असतो असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्या विषयी इच्छा व्यक्त केली. यावेळी 117 इच्छुक पदवीधर उमेदवार या मेळाव्यासाठी उपस्थित होते.यातील 50 विद्यार्थ्यांची पुढील प्रशिक्षणासाठी निबंध लेखन,वैयक्तिक मुलाखत आणि पात्रता परीक्षा यांच्या आधारे निवड केली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.तेजश्री दीपक राऊत-पवार प्रास्ताविक प्रा.आरिफ तांबोळी तर अतिथी परिचय प्रा. शिंदे मॅडम यांनी केले.व आभार प्रदर्शन प्रा.आनंद गायकवाड यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे. प्र प्राचार्य डॉ. दिपक राऊत- पवार, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिका कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.